Maharashtra News : बॉलीवूड प्रमाणेच मराठी सिनेसृष्टी देखील अलीकडे चांगलीच बहरली आहे. मराठी सिनेसृष्टीने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांची निर्मिती केली आहे. काही ब्लॉकबस्टर सिनेमे असे आहेत जे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. असाच एक मराठी सिनेसृष्टीतील ब्लॉकबस्टर सिनेमा म्हणजेच पछाडलेला सिनेमा.
खरंतर हा विनोदी हॉरर सिनेमा होता, या सिनेमा मधील हॉरर सीन जेवढी धडकी भरवणारे होते तेवढेच विनोदी सिन प्रेक्षकांना खळखळून हसवत होते. हेच कारण आहे की आजही हा हॉरर आणि विनोदी कॅटेगिरी चा चित्रपट प्रेक्षकांना भुरळ घालतोय.

खरंतर या चित्रपटात कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय पाहायला मिळाला होता आणि या चित्रपटातील कथानक सुद्धा तेवढेच भयावय होते. ‘सूड दुर्गे सूड’, ‘बाबा लगीन’ आणि ‘डोळे बघ डोळे बघ’ हे या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
डायलॉग आणि कथानकासोबतच या चित्रपटातील सीन सुद्धा तेवढेच हॉरर होते, या सिनेमात दाखवण्यात आलेला वाडा तर अगदीच काळजाचा ठोका चुकवणारा आणि धडकी भरवणारा होता. पण तुम्हाला पछाडलेल्या चित्रपटात दाखवण्यात आलेला वाडा कुठे आहे याची माहिती आहे का? नाही ना मग आज आपण याच संदर्भातील माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्रातील या जिल्ह्यात आहे पछाडलेला सिनेमातील वाडा
पछाडलेला सिनेमातील वाडा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील गगनबावडा येथे हा वाडा स्थित आहे. पंत अमात्य बावडेकर वाडा असे या वाड्याचे नाव आहे. फक्त पछाडलेला सिनेमाचं नाही तर मराठी सिनेसृष्टीतील इतरही अनेक मोठमोठ्या ब्लॉकबस्टर सिनेमांचे शूटिंग या वाड्यात पूर्ण झाले आहे.
यामुळे या वाड्याला पाहण्यासाठी अनेक पर्यटक भेटी देतात. या वाड्याच्या चहू बाजूला जंगल दिसते. हा वाडा एकदम भुताटकी दिसतो. आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा वाडा शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधान रामचंद्रपंत अमात्य यांच्या वंशजांनी बांधला आहे.
रामचंद्रपंत अमात्य यांचे नववे वंशज परशुरामपंत अमात्य यांनी हा वाडा बांधला असल्याची नोंद आहे. साधारणता 1935 च्या सुमारात या वाड्याचे बांधकाम पूर्ण झाले असावे अशी माहिती दिली जाते. पछाडलेला चित्रपटात दिसणारा हा भुताटकी वाडा कोल्हापूर पासून अवघ्या 46 किलोमीटरच्या अंतरावर आहे.
कसा होता पछाडलेला चित्रपट?
पछाडलेला चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्गज अभिनेते महेश कोठारे यांनी केले. हा चित्रपट 21 वर्षांपूर्वी म्हणजे 2004 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटाला दोन दशकांचा काळ पूर्ण झालाय पण आजही या चित्रपटाची भुरळ पाहायला मिळते. भरत जाधव, लक्ष्मीकांत बेर्डे, अश्विनी भावे, आणि इतर कलाकारांच्या जबरदस्त अभिनयाने हा चित्रपट ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत आलाय.
या चित्रपटाला मराठी प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दाखवला होता. या चित्रपटात दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एका पुजाऱ्याची भूमिका निभावली आहे. तसेच चित्रपटात भरत जाधव यांच्या अंगात वाड्यात भटकणारे आत्मे शिरत असल्याचे दाखवण्यात आले आहे.