अहिल्यानगर, नाशिक, संभाजीनगर, परभणी, बीडकरांसाठी खुशखबर ! ‘ह्या’ मार्गावर सुरू होणार नवीन एक्सप्रेस, राज्यातील 6 स्थानकावर थांबा घेणार

राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील 5 जिल्ह्यांमधून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.

Published on -

Maharashtra News : दक्षिण मध्य रेल्वेच्या माध्यमातून राज्यातील अहिल्यानगर नाशिक संभाजीनगर परभणी बीड जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी तिरुपती करिता विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

ही गाडी श्रीक्षेत्र साईनगर शिर्डी ते श्रीक्षेत्र तिरुपती बालाजी दरम्यान चालवली जाणार आहे. यामुळे या दोन्ही तीर्थक्षेत्रांना भेटी देणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान आता आपण साईनगर शिर्डी ते श्रीक्षेत्र बालाजी यादरम्यानच्या विशेष गाडीचे वेळापत्रक कसे राहणार या संदर्भातील संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून जाणून घेऊयात.

कसे राहणार विशेष गाडीचे वेळापत्रक?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की साईनगर शिर्डी ते तिरुपती विशेष एक्सप्रेस ट्रेन मराठवाड्यातून चालवली जाणार आहे. ही गाडी मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमधून चालवली जाईल आणि यामुळे मराठवाड्यातील तिरुपती बालाजीच्या भाविकांसाठी आणि साईबाबांच्या भक्तांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे. यामुळे मराठवाड्यातील भाविकांचा श्रीक्षेत्र शिर्डी आणि श्रीक्षेत्र तिरुपतीकडील प्रवास वेगवान होणार आहे.

या विशेष गाडीच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर ही विशेष गाडी (Train Number 07637) तिरुपती येथून तीन ऑगस्ट ते 28 सप्टेंबर 2025 या कालावधीत दर रविवारी सकाळी चार वाजता सोडली जाणार आहे आणि सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजता ही गाडी साईनगर शिर्डी येथे पोहोचणार आहे.

तसेच Train Number 07638 म्हणजेच साईनगर शिर्डी ते तिरुपती विशेष एक्सप्रेस ट्रेन 4 ऑगस्ट 29 सप्टेंबर 2025 या कालावधीत चालवली जाणार आहे.

या काळात ही गाडी दर सोमवारी शिर्डी येथून सायंकाळी 19.35 वाजता सोडली जाणार आहे आणि बुधवारी मध्ये रात्री दीड वाजता तिरुपती रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

कोण – कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार विशेष गाडी?

मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी तिरुपती विशेष गाडी मराठवाड्यातून चालवली जाणार आहे. या गाडीला राज्यातील सहा महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर आहे. शिर्डी तिरुपती विशेष एक्सप्रेस ट्रेन राज्यातील कोपरगाव, मनमाड,

नगरसोल, छत्रपती संभाजी नगर, परभणी, परळी वैजनाथ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. परळी वैजनाथच्या पुढे ही गाडी सिकंदराबाद, गुंटूर, नेल्लोर, गुडूर, रेणीगुंटा ह्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेईल असे म्हटले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!