भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे विमानतळ आपल्या महाराष्ट्रात ! कोणत्या शहरात विकसित होणार ? कस राहणार नवीन विमानतळ

भारतातील सर्वात मोठे विमानतळ हे हैदराबाद येथे आहे. मात्र आता आपल्या महाराष्ट्राला देखील काद्भुत विमानतळाची भेट मिळणार आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे विमानतळ आपल्या राज्यात तयार होणार आहे. हे विमानतळ नवी मुंबईत तयार होणार आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra News

Maharashtra News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. हवाई वाहतूक सुधारित व्हावी यासाठी वेगवेगळ्या शहरांदरम्यान विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच देशातील अनेक शहरांमध्ये नवीन विमानतळ देखील तयार होत आहेत. भारतातील सर्वात मोठे विमानतळ हे हैदराबाद येथे आहे. मात्र आता आपल्या महाराष्ट्राला देखील काद्भुत विमानतळाची भेट मिळणार आहे.

देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे विमानतळ आपल्या राज्यात तयार होणार आहे. हे विमानतळ नवी मुंबईत तयार होणार आहे. दरम्यान आज आपण या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या विमानतळाची माहिती जाणून घेणार आहोत.

कस असेल नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ

भारताच्या आर्थिक राजधानीत आणि महाराष्ट्राच्या राज्य राजधानीत सध्या फक्त एक विमानतळ आहे. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबईतील एकमेव विमानतळ. यामुळे या एअरपोर्टवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा ताण येत असून विमान प्रवाशांना याचा फटका बसतोय.

दरम्यान हाच वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशातील नवी मुंबई येथे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित केले जात आहे.

या विमानतळाचा रणवे हा 3.7 km लांबीचा असून या विमानतळावर एकाच वेळी तब्बल 350 विमाने उभे राहतील असे म्हटले जात आहे. महत्वाची बाब अशी की या विमानतळाचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आले असून येत्या काही महिन्यांनी हे विमानतळ प्रवाशांसाठी खुले होणार आहे.

खरे तर 2024 अखेरपर्यंत हे विमानतळ प्रवाशांच्या सेवेतील असे म्हटले जात होते मात्र नियोजित वेळेत या विमानतळाचे काम पूर्ण होऊ शकले नाही आणि यामुळे याचे उद्घाटन आता लांबणीवर पडले आहे. मात्र नव्या वर्षात हे विमानतळ 100% प्रवाशांच्या सेवेत येणार असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट चे काम आता अंतिम टप्प्यात आले असून काम पूर्ण झाल्यानंतर येथे व्यावसायिक उड्डाणाची चाचणी घेतली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या विमानतळाचे टर्मिनल हे भुयारी मेट्रो मार्गासोबत कनेक्ट होणार आहे. मेट्रोची कनेक्टिव्हिटी असणारे हे भारतातील पहिलेच विमानतळ असेल.

या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे काम जवळपास 80% पर्यंत पूर्ण झाले असून 31 डिसेंबर रोजी या विमानतळावर व्यावसायिक उड्डाणाची चाचणी घेतली जाणार आहे आणि एप्रिल 2025 पासून हे विमानतळ प्रवाशांसाठी खुले होणार आहे. एप्रिल 2025 मध्ये या विमानतळाचा पहिला टप्पा सुरू होईल आणि त्यानंतर दुसरा टप्पा 2029 मध्ये खुला होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe