महाराष्ट्रासाठी गुड न्यूज ! ‘या’ महामार्ग प्रकल्पांतर्गत विकसित होणाऱ्या दुसऱ्या बोगद्याचे काम झाले पूर्ण, कधी सुरू होणार महामार्ग ? वाचा सविस्तर

जुलै २०२५ पर्यंत या महामार्ग प्रकल्पाचे काम पुर्ण करण्याच्या जोरदार हालचाली प्राधिकरणाकडून सूरु आहेत. या दुहेरी बोगद्यामुळे आणि प्रशस्त महामार्गामुळे काही मिनिटांत बदलापूर येथील नागरिकांना पनवेल, उरण जेएनपीटी बंदरामध्ये आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पापर्यंत पोहचता येणार आहे.

Published on -

Maharashtra News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात गेल्या दहा वर्षांच्या काळात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. हजारो किलोमीटर लांबीच्या महामार्गांची कामे गत दहा वर्षांच्या काळात पूर्ण झाली आहेत. भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीच्या सरकारने आता तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली असून पुढील पाच वर्षात आणखी मोठमोठ्या महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण होतील अशी आशा आहे.

राज्यातही अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे येत्या काही दिवसांनी पूर्ण होणार आहेत. राज्यात सध्या अनेक रस्त्यांची कामे सुरू आहेत. बडोदा मुंबई महामार्गाचे काम देखील गेल्या काही दिवसांपासून युद्ध पातळीवर सुरू आहे.

दरम्यान आता याच महामार्ग प्रकल्पासंदर्भात आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या महामार्ग प्रकल्पांतर्गत शेवटच्या पॅकेजमधील माथेरान डोंगर रांगांखालील शिरवली गावालगतच्या दुसऱ्या बोगद्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.

यातील पहिल्या बोगद्याचे खोदकाम ऑगस्ट महिन्यात आरपार झाल्यानंतर दूसरा बोगद्याचे खोदकाम कधी पुर्ण होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान आता या दुसऱ्या बोगद्याचे काम 16 ऑक्टोबरला पूर्ण झाले असल्याची घोषणा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आली आहे.

त्यामुळे या बडोदा मुंबई महामार्गाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होईल आणि नियोजित वेळेत हा रस्ता सर्वसामान्यांसाठी खुला होणार अशी आशा बळावली आहे. सध्या या मार्गावर युद्धपातळीवर रस्त्याचे बांधकाम सूरु असून येत्या नऊ महिन्यात या रस्त्याचे पूर्ण काम होईल अशी माहिती समोर येत आहे.

जुलै २०२५ पर्यंत या महामार्ग प्रकल्पाचे काम पुर्ण करण्याच्या जोरदार हालचाली प्राधिकरणाकडून सूरु आहेत. या दुहेरी बोगद्यामुळे आणि प्रशस्त महामार्गामुळे काही मिनिटांत बदलापूर येथील नागरिकांना पनवेल, उरण जेएनपीटी बंदरामध्ये आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पापर्यंत पोहचता येणार आहे.

यामुळे बदलापूर व आजूबाजूच्या परिसराचा एकात्मिक विकास सुनिश्चित होणार आहे. तथापि, बडोदा मुंबई महामार्ग प्रकल्प विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर ला जोडला जाणार आहे. पण अजून विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडोर चे भूसंपादनाचे काम पूर्ण झालेले नाही.

त्यामुळे येत्या नऊ महिन्यात बडोदा मुंबई महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम होणार असले तरी देखील पुढे हा मार्ग विरार अलिबाग मल्टी मॉडेल कोरिडोर ला जोडन्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe