महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मिळणार एका नव्या हायवेची भेट ! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार अंतिम निर्णय

विदर्भाला आणखी एका नव्या एक्सप्रेस वे ची भेट मिळणार आहे. विदर्भातील तीन जिल्हे नव्या एक्सप्रेस वे मुळे जोडली जाणार आहेत. 

Published on -

Maharashtra News : समृद्धी महामार्ग आता पूर्ण क्षमतेने सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. यामुळे राजधानी मुंबईत उपराजधानी नागपूर या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास वेगवान झालाय. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास अवघ्या आठ तासांमध्ये शक्य होतोय.

दुसरीकडे आता समृद्धी महामार्गाचा विस्तारीकरणाच्या प्रकल्पाला देखील गती मिळत आहे. समृद्धी महामार्गाचा विस्तार म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाकडून भंडारा ते गडचिरोली दरम्यान नवीन महामार्ग तयार केला जाणार आहे. दरम्यान आता याच महामार्ग प्रकल्पाबाबत नवीन माहिती समोर आली आहे.

काय आहे नवीन अपडेट

खरंतर, भंडारा-गडचिरोली एक्सप्रेसवे आणि सावर्खेडा-गडेगाव लिंक मार्गासाठी नुकतीच संयुक्त मोजणी सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे येत्या काही दिवसांनी प्रत्यक्षात या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.

खरंतर हा महामार्ग भंडारा गोंदिया आणि गडचिरोली हे तीन जिल्हे जोडणार आहे. हा महामार्ग प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते गडचिरोली दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचे काम एकूण तीन पॅकेज मध्ये होणार आहे. नागपूर ते गोंदिया, गोंदिया ते गडचिरोली आणि नागपूर ते चंद्रपूर अशा तीन पॅकेज मध्ये याचे काम केले जाईल. 

राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर काम सुरू होणार 

 या प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठीची निविदा प्रक्रिया मागील वर्षी म्हणजेच 2024 मध्याच संपन्न झाली होती. पण मागील वर्षी घेण्यात आलेल्या निविदा अपेक्षेपेक्षा जास्त दराने आल्या होत्या.

त्यामुळे, राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या निविदा प्रक्रियेतील कॉन्ट्रॅक्टर सोबत वाटाघाटी करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाटाघाटीचे काम सुरू होते. आता या वाटाघाटी अखेर पूर्ण झाल्या आहेत.

राज्य रस्ते विकास महामंडळ आणि संबंधित ठेकेदारांमध्ये सुरू असणारी वाटाघाटी संपन्न झाली असल्याने आता याचे सुधारित अंदाजपत्रक राज्य मंत्रिमंडळाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे.

दरम्यान राज्य मंत्रिमंडळाकडून या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्षात ठेकेदारांना वर्कऑर्डर म्हणजेच कामाचे आदेश दिले जाणार आहेत.

कामाचे आदेश मिळाल्यानंतर मग संबंधित ठेकेदारांकडून प्रत्यक्षात बांधकामाला सुरुवात होणार आहे. भंडारा ते गडचिरोली दरम्यान विकसित केल्या जाणाऱ्या नव्या एक्सप्रेस वे मुळे विदर्भातील एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!