महाविकास आघाडी सरकारला आपल्या आधीच्या चुका महागात पडणार ! विधानसभा निवडणुकीत जनता कोणाला कौल देणार ?

महाराष्ट्रातील थोर नेते समाज सुधारक यांचा विरोध करण्याची काँग्रेसला फार जुनी आणि अगदीच वाईट सवय जडलेली आहे. जाणता राजा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा देखील काँग्रेसने विरोध केला आहे विशेष. महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावरकर यांसारख्या दिग्गज नेत्यांचा आणि महापुरुषांचा काँग्रेसने सातत्याने विरोध केला आहे. जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात शिवाजी महाराजांना ‘विश्वासघाती दरोडेखोर’ असे म्हटले आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात समाधानकारक परिणाम अनुभवायला मिळाले आहेत. यामुळे महाविकास आघाडी सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणारे सर्वच पक्ष भाजप आणि महायुती सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. काँग्रेस, शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा शिवसेना हे तीनही पक्ष भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या इतर मित्र पक्षांमधील नेत्यांवर हल्लाबोल करत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडल्याच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) आणि शिवसेना (यूबीटी) यांनी नुकतेच रस्त्यावर उतरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टरवर बूट फेकलेत. निवडणुकीपूर्वी भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण व्हावे, यासाठी काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष मराठा आरक्षण आणि इतर मुद्दे उपस्थित करून आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीसारखी कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडी मधील सर्वच घटक पक्षांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.

पण, या वातावरण निर्मितीचा महाविकास आघाडीला फारसा फायदा होणार नसल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) आणि शिवसेना (यूबीटी) मधील नेते जे आरोप करत आहेत, जो दावा करत आहेत त्यावर महाराष्ट्रातील जनता सहजासहजी विश्वास ठेवणार नाही असे दिसत आहेत. महाराष्ट्रातील जनतेचा असा विश्वास आहे की काँग्रेसने महाराष्ट्राच्या हिताला कधीही प्राधान्य दिलेले नाही आणि राज्यातील महान व्यक्तींचा नेहमीच अपमान केला आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आधीच्या चुका महाविकास आघाडीला जड भरतील असे बोलले जात आहे.

महाराष्ट्रातील आद्य व्यक्तींचा विरोध करणे ही काँग्रेसची सवय

खरेतर महाराष्ट्रातील थोर नेते समाज सुधारक यांचा विरोध करण्याची काँग्रेसला फार जुनी आणि अगदीच वाईट सवय जडलेली आहे. जाणता राजा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा देखील काँग्रेसने विरोध केला आहे विशेष. महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावरकर यांसारख्या दिग्गज नेत्यांचा आणि महापुरुषांचा काँग्रेसने सातत्याने विरोध केला आहे. जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात शिवाजी महाराजांना ‘विश्वासघाती दरोडेखोर’ असे म्हटले आहे.

यावरून काँग्रेसची छत्रपतींवर किती श्रद्धा आहे हे दिसते. अहो फक्त नेहरूच छत्रपती विरोधी होते असे नाही तर काँग्रेसने मध्य प्रदेश आणि बागलकोटमध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे हटवले आहेत. मंगळूरु मध्ये देखील अशीच परिस्थिती तयार केली जात आहे. शिवाय, यापूर्वी मुंबई महाराष्ट्राला देण्यासही पक्षाने विरोध केला आहे. फक्त काँग्रेसच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनीही शिवाजी महाराजांच्या विचारसरणीला विरोध केला आहे.

हे तर सोडाच ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी, छत्रपती शिवरायांच्या विचारासाठी कधीच काँग्रेस सोबत हातमिळवणी केली नाही त्यांचं बाळासाहेबांचे पुत्र अर्थात उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसच्या विचारांचा स्वीकार केला आहे. कर्नाटकातील मंगळुरू येथे शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यास काँग्रेस नेत्यांनी विरोध केला आणि महाराष्ट्राच्या एमव्हीए सरकारने अमरावती आणि दर्यापूरमध्ये त्यांचे पुतळे हटवले.

कर्नाटकात काँग्रेस नेते सतीश जारकीहोळी यांनी शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केले असून संजय राऊत यांनी त्यांच्या वंशावर प्रश्न उपस्थित केले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या वंशावळीवर प्रश्न उपस्थित करत अपमानास्पद वक्तव्य केले आहे.  शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्यावर अपमानास्पद वक्तव्य केले आहे. त्यांनी संभाजीराजे यांच्या वंशावळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांची रक्त तपासणी करावी असे सुचविले.

MVA नेत्यांवर किल्ल्यांवरील बेकायदेशीर अतिक्रमणांना आश्रय देण्याचा आणि वक्फ बोर्डाकडून मोठ्या प्रमाणावर जमीन हडप करण्यास समर्थन केल्याचा आरोप आहे. मराठा साम्राज्याचा शत्रू असलेल्या औरंगजेबलाही त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद भाषा वापरून त्यांच्या महानतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी औरंगजेब आणि अफझलखानाची प्रशंसा केली आणि दावा केला की शिवाजी महाराज त्यांच्यामुळेच महान होते.

यूबीटी नेते संजय राऊत यांनी औरंगजेब आणि मुघलांचे कौतुक करताना म्हटले की त्यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला नाही. मुघलांपासून स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या छत्रपती शिवरायांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा हा अनादरचं आहे. पण, जनता जनार्दन काँग्रेसच्या या आधीच्या चुका पाहता पुन्हा एकदा काँग्रेसला महाराष्ट्राच्या सत्तेबाहेर ढकलणार की छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला पुन्हा महाराष्ट्रात स्थान देणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe