शेतकऱ्यांसाठी गोड बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ बाजारात कांद्याचे दर 7 हजार पार, वाचा सविस्तर

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Onion Rate

Maharashtra Onion Rate : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी हाती आली आहे. ती म्हणजे आज कांदा बाजार भावात मोठी सुधारणा झाली आहे.

राज्यातील अनेक बाजारांमध्ये कांद्याचे दर सुधारले असून काही ठिकाणी कांदा बाजार भाव सात हजार पार गेले आहेत. खरंतर गेला काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने हाच प्रश्न उपस्थित केला जात होता की कधी कांद्याचे भाव हे 7000 पार जाणार.

दरम्यान आज राज्यातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर हे 7000 पार गेले आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 30,859 क्विंटल लाल कांदा आवक झाली होती.

आजच्या लिलावात या मार्केटमध्ये लाल कांद्याला किमान 500 कमाल 7,100 आणि सरासरी तीन हजार 100 असा भाव मिळाला.

या बाजारात कांदा दर 6500 पार
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रमाणे राज्यातील कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील आज कांद्याला चांगला विक्रमी भाव मिळाला. या बाजारात आज कांद्याची 3127 क्विंटल आवक झाली.

आजच्या लिलावात या बाजारात कांद्याला किमान 1000, कमाल 6600 आणि सरासरी 3 हजार असा भाव मिळाला. यासोबतच आज दौंड केडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला विक्रमी भाव मिळालाय.

या एपीएमसी मध्ये आज 825 क्विंटल कांदा आवक झाली होती. आजच्या लिलावात या बाजारात कांद्याला किमान 1500, कमाल 6 हजार 600 आणि सरासरी 4500 असा भाव मिळाला.

तसेच आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दोन हजार, कमाल 6000 आणि सरासरी 4000 असा विक्रमी दर मिळाला.

जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा आज चिंचवड कांद्याला किमान 3800, कमाल 6010 आणि सरासरी 5000 असा विक्रमी भाव मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe