होळीच्या आधीचं सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घसरण, किती कमी झाला भाव?

Published on -

Maharashtra Petrol Diesel Price : उद्या 14 मार्च 2025 रोजी देशात होळीचा सण साजरा होणार आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान होळीच्या आधीच महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत महाराष्ट्रात थोडीशी घसरण झाली आहे.

यामुळे महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल अशी आशा आहे. खरे तर देशातील अनेक प्रमुख महानगरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. परंतु देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राच्या राज्य राजधानीत अर्थातच मुंबईमध्ये आज पेट्रोलच्या किमतीत घसरण दिसली आहे.

यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीपासून ते चेन्नईपर्यंत सर्वच शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 4 पैसे ते 1 रुपये प्रति लिटरपर्यंत दरवाढ दिसून आली आहे.

यातील सर्वाधिक वाढ ही कोलकत्ता शहरात दिसून आली. दुसरीकडे आज देशाच्या आर्थिक राजधानीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घसरण दिसली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यात आणि यामुळे मुंबईत आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नॉर्मल घसरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईत किती कमी झाला भाव

आर्थिक राजधानी मुंबईत आज पेट्रोलच्या किमतीत घसरण झाली आहे. यामुळे मुंबईकर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरात पेट्रोलप्रमाणेचं डिझेलच्या किंमतीत सुद्धा घसरण झाली आहे आणि यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

IOCL च्या आकड्यांनुसार, आज 13 मार्च 2025 रोजी मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत 44 पैसे प्रति लिटरची कपात दिसली आहे, या कपातीनंतर आज मुंबईत पेट्रोलची किंमत 103.50 रुपये प्रति लिटर झाली आहे.

तसेच, आज मुंबईत डिझेलच्या किंमतीत सर्वाधिक 2.12 रुपये इतकी कपात झाली आहे. या कपाती नंतर आज राजधानीत डिझेलची किंमत 90.03 रुपये प्रति लिटर झाली, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.

इतर शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे भाव

राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली आणि चेन्नई या महानगरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 5 पैशांची वाढ दिसून आली. दिल्लीत पेट्रोलचा भाव आता 94.77 रुपए प्रति लिटर तर डिझेल 87.67 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे.

चेन्नईत पेट्रोलची किंमत 100.80 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा भाव 92.39 रुपये प्रति लिटर झाले आहे. कोलकत्तामध्ये पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमतीत सर्वाधिक एक रुपये प्रति लिटर वाढ दिसून आली.

कोलकत्तामध्ये पेट्रोलची किंमत 1.07 रुपये प्रति लिटरची वाढ दिसून आली. ही किंमत 105.01 रुपये प्रति लिटर इतकी झाली. डिझेलची किंमत 1.06 रुपये प्रति लिटरने वाढली, या दरवाढीनंतर आता सदर शहरात डिझेलचा भाव 91.82 रुपये प्रति लिटर इतका झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe