Maharashtra Picnic Spot : महाराष्ट्राला अद्भुत असे नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पिकनिक साठी जगभरातील लोक येतात. राज्यातील कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. दरम्यान जर तुमचा आहे यंदाच्या हिवाळी हंगामात पर्यटनाचा विचार असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.
आज आपण कोकणातील अशा एका ठिकाणाची माहिती जाणून घेणार आहोत जिथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. चारही बाजूने पाणी, मनमोहक दृश्य आणि सुंदर नजारा या ठिकाणाची सुंदरता फारच वाढवते.
नैसर्गिक सौंदर्याने नटलेले कोकणातील हे ठिकाण काही लोकांना मात्र अजूनही माहिती नाही. यामुळे आज आपण या ठिकाणाची सविस्तर माहिती पाहणार आहोत. कोकणात समृद्र किनाऱ्यांसह अनेक पर्यटन स्थळे प्रसिद्ध आहेत.
कोकणात अनेक मंदिरे देखील आहेत. गणपतीपुळे सारख्या ठिकाणी अनेक ऐतिहासिक मंदिरे आहेत. पण कोकणात एक असे गाव आहे, जेथे चारही बाजूने पाणी आहे आणि तेथील घराबाहेर होड्या पार्क केल्या आहेत.
म्हणजेच या ठिकाणी लोक बोटीने प्रवास करतात. कोकणातील जैतापूर येथून अगदीच हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या गावाला अनेकजण भेटी देतात. जुवे हे कोकणातील असे एक सुंदर गाव आहे जेथील नैसर्गिक सौंदर्यता तुम्हाला भारावून सोडणार आहे.
या गावाला भेट देण्यासाठी सर्वात आधी रत्नाागिरीतून राजापूर आणि त्यानंतर जैतापूरला जावे लागेल. तुम्ही रत्नागिरीतून राजापूर आणि त्यानंतर जैतापूरला बसने जाऊ शकता. मात्र येथून पुढे प्रवास करण्यासाठी तुम्हाला बस उपलब्ध राहणार नाही.
कारण की जुवे गाव हे चहुबाजूने पाण्याने वेढलेले आहे. म्हणून येथे जाण्यासाठी पर्यटकांना जैतापूरहून होडी म्हणजे बोटीने जुवे गावात जावे लागणार आहे. हा बोटीचा प्रवास नक्कीच तुम्हाला एक वेगळाच अनुभव देऊन जाणार आहे.
जुवे गाव त्याच्या निळ्याशार पाण्याने आणि मनमोहक सोंदर्यांने पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असते. म्हणून हिवाळ्यात पर्यटनाला कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही कोकणातील या निसर्गरम्य ठिकाणाची निवड करू शकता.