Maharashtra Picnic Spot : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री झाली असल्याचे जाहीर केले आहे. यावर्षी मान्सून वेळेच्या आधीच देशात दाखल झाला आहे. दरम्यान पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने आता अनेकजण पिकनिकचा प्लॅन बनवणार आहेत.
पावसाळी पिकनिक साठी शिमला, मनाली आणि मसूरी सारख्या ठिकाणांना पर्यटकांच्या माध्यमातून प्राधान्य दाखवले जाते. मात्र जर तुम्हाला शिमला, मनाली आणि मसूरी सोडून दुसरीकडे पिकनिकला जायचे असेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा राहणार आहे.

आज आपण भारतातील अशा काही लोकप्रिय ठिकाणांची माहिती जाणून घेणार आहोत जिथे जून महिन्यात पिकनिकला गेल्यास तुम्हाला शिमला, मनाली आणि मसूरी पेक्षा चांगला अनुभव मिळणार आहे. आज आपण जून महिन्यात जिथे थंडी असते आणि गर्दी कमी असते अशा हिल स्टेशनची माहिती पाहणार आहोत.
जून महिन्यात या हिल स्टेशनला एकदा अवश्य भेट द्या
चिकमंगळूर : भारतातील उत्तरेकडे अनेक हिल स्टेशन आहेत. देशाच्या उत्तरे सोबतच दक्षिणेकडील भागांमध्येही काही लोकप्रिय हिल स्टेशन आहेत. दक्षिण भारतात जूनच्या तीव्र उष्णतेपासून आराम देणारी अनेक अद्भुत ठिकाणे आपल्याला पाहायला मिळतात.
चिकमंगळूर हे दक्षिण भारतातील असेच एक लोकप्रिय ठिकाण आहे. कर्नाटकातील हे ठिकाण पर्यटकांमध्ये फारच लोकप्रिय आहे मात्र तरीही येथे पर्यटकांची फारशी गर्दी नसते आणि येथील अल्हाददायक आणि शांततापूर्ण वातावरण तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. हे ठिकाण येथील हिरवळ, कॉफ़ी गार्डन आणि धबधब्यांसाठी विशेष ओळखले जाते.
या ठिकाणी तुम्हाला भद्रा वन्यजीव अभयारण्य, हनुमान गुंडी धबधबा आणि कॉफी संग्रहालय एक्सप्लोर करता येणार आहे. निसर्गप्रेमींसाठी आणि ट्रेकिंगची आवड असणाऱ्या लोकांसाठी हे ठिकाण परफेक्ट ठरणार आहे. जून महिन्यात पिकनिकला जायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी आवर्जून भेट द्यायाला हवी.
कुर्ग : जून महिन्यात अनेक जण थंड हवेच्या ठिकाणी जातात. कुर्ग हे देखील असेच एक थंड हवेचे ठिकाण आहे आणि येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. येथे देशातील कानाकोपऱ्यातील पर्यटक पिकनिक साठी येतात. तुम्हालाही जून महिन्यात पिकनिकला जायचे असेल तर तुम्ही या ठिकाणाची निवड करू शकता.
या ठिकाणाला भारताचे स्कॉटलंड म्हणून ओळखले जाते. येथील शांतता, हिरवळ, थंड हवामान आणि कॉफीचे मळे तुम्हाला आकर्षित करतील. राजाचे थडगे, इरुप्पू धबधबा, नागरहोल राष्ट्रीय उद्यान, पुष्पगिरी वन्यजीव अभयारण्य हे या ठिकाणाचे काही प्रमुख आकर्षाने आहेत. तुम्हाला शहरातील गर्दीपासून शांतता हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी पिकनिकचा प्लॅन बनवा.
मॅकलिओड गंज : हे हिमाचल प्रदेश मधील एकच छोटसं हिल स्टेशन आहे. हे ठिकाण धर्मशाळा जवळ आहे आणि याचे नैसर्गिक सौंदर्य फारच नेत्र दीपक आहे. येथील शांत वातावरण आणि तिबेटी संस्कृती तुमच्या मनाला भावणार आहे. तुम्ही इथे गेलात तर येथील नामग्याल मठ, भागसू धबधबा, त्सुगलागखांग कॉम्प्लेक्स, धरमकोट एक्सप्लोर करायला विसरू नका.