Maharashtra Picnic Spot : महाराष्ट्रातील नैसर्गिक सौंदर्य हे फारच नेत्र दीपक आहे. राज्याला शेकडो किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनारा लाभलेले आहेत. कोकणात असंख्य समुद्रकिनारें आपल्याला पाहायला मिळतात. यामुळे गोव्याप्रमाणेच कोकणातही पर्यटक दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
लाखो पर्यटक दरवर्षी कोकणाच्या समुद्रकिनाऱ्यावर पिकनिक साठी येतात. ऋतू कोणताही असो समुद्रकिनारी फिरण्याची मजा काही औरच असते. समुद्रात फेसाळणाऱ्या पांढराशुभ्र लाटा, समुद्रातील निळेशार पाणी तेथील शांतता प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते.

समुद्रकिनाऱ्यावरील थंडगार वारा प्रत्येकालाच अल्हाददायक अनुभव देतो. हेच कारण आहे की दरवर्षी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होते. समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य प्रत्येकालाच भुरळ घालते.
पण तुम्हाला रात्रीच्या अंधारात चमकणारा समुद्रकिनारा ठाऊक आहे का? हो बरोबर वाचत आहात तुम्ही, रात्रीच्या अंधारात चमकणारा समुद्रकिनारा. देशात असाही एक समुद्रकिनारा आहे जो रात्रीच्या अंधारात चमकतो. महत्वाची बाब म्हणजे हा समुद्रकिनारा आपल्या महाराष्ट्रातच आहे.
दरम्यान आज आपण याच समुद्रकिनाऱ्याची माहिती जाणून घेणार आहोत. खरे तर भारतात असे काही निवडक समुद्रकिनारें आहेत जे रात्रीच्या वेळी चमकतात. यातील एक समुद्रकिनारा आपल्या महाराष्ट्रातील आहेत.
हे समुद्रकिनारें रात्रीच्या वेळी चमकतात
मालवण : कोकणातील मालवण येथील समुद्रकिनारा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतो. येथील अथांग समुद्रकिनारा आणि शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. मालवण येथील समुद्रकिनारा हा रात्रीच्या वेळी चमकतो.
ज्याप्रमाणे आकाशातील तारे रात्रीच्या वेळी चमकतात तसाच हा समुद्रकिनारा सुद्धा रात्रीच्या वेळी चमकतो. यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मालवण येथील रात्रीचा नजारा हा खरच पाहण्यासारखा असतो.
राधानगरी बीच : अंदमान आणि निकोबार येथील राधानगरी बीच हा समुद्र किनारा देखील रात्रीच्या वेळी चमकतो. अंदमान आणि निकोबार येथील हॅवलॉक बेटावर हा समुद्र किनारा आहे. हा समुद्रकिनारा रात्रीच्या वेळी निळ्या आणि हिरव्या रोषणाईने नटलेला दिसतो.
वर्कला समुद्रकिनारा : केरळ मधील या समुद्रकिनाऱ्याला पापनाशम बीच म्हणूनही ओळखले जाते. केरळ मधील हा समुद्रकिनारा फारच अथांग आणि अगदीच शांत आहे. केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यात हा शांत समुद्रकिनारा पाहायला मिळतो. हा समुद्रकिनारा सुद्धा रात्रीच्या वेळी चमकतो.
मंदारमणी समुद्रकिनारा : पश्चिम बंगालमधील हा समुद्रकिनारा सुद्धा रात्रीच्या वेळी चमकतो असे सांगितले जाते. हा समुद्रकिनारा पूर्व मिदनापूर जिल्ह्यात आहे. हा सुद्धा समुद्रकिनारा रात्रीच्या वेळी चमकत असतो.
पालोलेम बीच : हा समुद्रकिनारा गोव्यात आहे. गोव्यातील हे बीच नेहमीच पर्यटकांमध्ये चर्चेचा विषय ठरते. कारण हा सुद्धा समुद्र किनारा रात्रीच्या वेळी चमकतो आणि येथे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.