महाराष्ट्रातून मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशला जाणाऱ्यांसाठी सुरू झाली नवीन एक्सप्रेस ! ‘या’ ९ रेल्वे स्टेशनवर घेणार थांबा

Published on -

Maharashtra Railway : महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की उत्तर महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या स्थानकातून आता थेट उत्तर प्रदेश साठी विशेष गाडी सुरू करण्याची मोठी घोषणा रेल्वे विभागाकडून करण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याच्या भुसावळहून उत्तर प्रदेशातील प्रयागराजदरम्यान नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. नक्कीच या विशेष एक्सप्रेस ट्रेन मुळे भुसावळ ते प्रयागराजदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते प्रयागराज दरम्यान विशेष एकेरी गाडी चालविण्याचा निर्णय घेतला असून, ही गाडी ‘ऑन डिमांड स्पेशल’ म्हणून धावणार आहे. सण-उत्सव, लग्नसराई तसेच अचानक वाढलेल्या प्रवासी गर्दीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१२१३ ही विशेष गाडी सोमवार, दिनांक १५ रोजी सायंकाळी १८:३५ वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे.

ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ११:३५ वाजता प्रयागराज येथे पोहोचणार आहे. सुमारे १७ तासांचा प्रवास असलेल्या या गाडीमुळे भुसावळ, जळगाव जिल्हा तसेच खानदेश परिसरातील प्रवाशांना थेट प्रयागराजपर्यंत जाण्यास सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

या विशेष गाडीला मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यानुसार खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, मदन महाल (जबलपूर), कटनी, मैहर, सतना आणि माणिकपूर या स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे.

या स्थानकांवरील प्रवाशांनाही या गाडीचा लाभ घेता येणार आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या मागणीचा आढावा घेऊन ‘ऑन डिमांड स्पेशल’ गाड्या चालविण्यात येतात.

या मार्गावर सध्या नियमित गाड्यांमध्ये मोठी गर्दी असल्याने अतिरिक्त गाडीची गरज होती. त्यानुसारच भुसावळ–प्रयागराज ही विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे.

या गाडीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात अशा आणखी गाड्या चालविण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, प्रवाशांनी या गाडीचे आरक्षण अधिकृत रेल्वे आरक्षण प्रणालीद्वारेच करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

प्रवासापूर्वी गाडीच्या वेळापत्रकात किंवा थांब्यांमध्ये काही बदल झाल्यास त्याबाबतची माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा चौकशी केंद्रातून घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या विशेष गाडीमुळे भुसावळ ते प्रयागराज दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News