आनंदाची बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ भागात तयार होणार 494 कोटी रुपयांचा नवा रेल्वे मार्ग, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेल्वे मंत्रालयाने नुकत्याच एका महत्त्वाच्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली असून या 494 कोटी रुपयांच्या नव्या प्रकल्पाचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. 

Published on -

Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राला पुन्हा एका नव्या रेल्वेमार्गाची भेट मिळणार आहे. खरे तर भारतीय रेल्वेचे सध्याचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक लांबीचे रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखले जाते.

देशात सध्या स्थितीला साडेसात हजाराहून अधिक रेल्वे स्थानक आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे भारतात अजूनही नवनवीन रेल्वे मार्ग विकसित केले जात आहेत आणि नवनवीन रेल्वे स्थानक सुद्धा विकसित होत आहेत.

त्यामुळे रेल्वेची कनेक्टिव्हिटी आधीच्या तुलनेत अधिक मजबूत होत आहे. महाराष्ट्रात सुद्धा नवनवीन रेल्वे मार्ग विकसित होत आहेत.

दरम्यान राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे, ती म्हणजे जिल्ह्यात 494 कोटी रुपयांचा नवा रेल्वे मार्ग विकसित होणार असून या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.

कसा असणार नवा रेल्वे मार्ग ?

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी ते शनिशिंगणापूर यादरम्यान नवा रेल्वे मार्ग तयार केला जाणारा सोन या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी जवळपास 494 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

दरम्यान या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला म्हणजेच राहुरी शनिशिंगणापूर रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामाला रेल्वे मंत्रालयाकडून नुकतीच मान्यता देण्यात आली आहे.

हा रेल्वे मार्ग 21.84 किलोमीटर लांबीचा राहणार असून यासाठी 494.13 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती संबंधितांकडून प्राप्त झाली आहे.

नव्या रेल्वे मार्गाचा फायदा काय होणार?

 494.13 कोटी रुपये खर्च करून राहुरी ते शनिशिंगणापूर दरम्यान नवीन रेल्वे मार्ग तयार होणार असून या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे श्रीक्षेत्र शनिशिंगणापूरला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

खरे तर दररोज श्री क्षेत्र शनी शिंगणापूरला भाविकांची मोठी वर्दळ पाहायला मिळते. शनिशिंगणापूर येथे शनि देवाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातील कानाकोपऱ्यातील लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

यामुळे हा नवीन रेल्वे मार्ग श्री क्षेत्र शनिशिंगणापूरच्या विकासासाठी आणि भाविकांसाठी मोठा फायद्याचा राहणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.

शनिशिंगणापूर सोबतच शिर्डी, राहु-केतू मंदिर (राहुरी), मोहिनी राज मंदिर (नेवासा) आणि पैस खांब करवीरेश्वर मंदिर (नेवासा) अशा इतर धार्मिक आणि पर्यटन स्थळांना सुद्धा या नव्या मार्गाचा फायदा होणार आहे.

या प्रस्तावित करण्यात आलेल्या नव्या रेल्वे मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालात म्हणजे डीपीआरमध्ये दररोज चार जोड्या प्रवासी गाड्यांचा प्रस्ताव ठेवण्यात आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe