महाराष्ट्रात तयार होणार आणखी एक रेल्वेमार्ग ! ‘या’ जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्पाला मंजुरी, कसा असणार 240 कोटी रुपयांचा नवा मार्ग ?

महाराष्ट्रातील एका बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नुकतीच मंजुरी दिली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली असून यासाठी जवळपास 240 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. 

Published on -

Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक गुड न्यूज हाती आली आहे. खरे तर भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असल्याने तसेच रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले असल्याने अनेकजण रेल्वे प्रवासाला प्राधान्य दाखवतात.

अहवालानुसार भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. विशेष बाब अशी की आगामी काळात हे नेटवर्क आणखी वाढणार आहे आणि यामुळे देशातील रेल्वे प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल.

दरम्यान राज्यातील रेल्वेचे नेटवर्क आणखी बळकट व्हावे यासाठी भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या प्रकल्पासाठी केंद्रातील सरकारकडून कोट्यावधी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा – शिर्डी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला रेल्वे मंत्रालयाने नुकतीच मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर या दुहेरीकरणासाठी 239.80 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. 

कसा आहे प्रकल्प?

अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा ते शिर्डी दरम्यानच्या 16.5 km लांबीच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणास केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च जवळपास 239.80 कोटी रुपयांचा आहे.

खरे तर ही दोन्ही शहरे आधीच रेल्वेने कनेक्ट आहेत, मात्र या मार्गावर फक्त सिंगल ट्रॅक आहे. पण लवकरच या मार्गाचे दुहेरीकरण होणार आहे. पुणतांबा ते शिर्डी दरम्यान अनेक ट्रेन चालवल्या जात असून यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात ताण येतोय.

दरम्यान हाच वाहतुकीचा ताण कमी व्हावा या अनुषंगाने पुणतांबा शिर्डी या रेल्वे मार्गाची दुहेरीकरण हाती घेण्यात आले आहे. दरम्यान पुणतांबा ते शिर्डी दरम्यानच्या मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतर या मार्गावर प्रवास करणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

श्रीक्षेत्र शिर्डी येथे दर्शनाला जाणाऱ्या साई भक्तांना तर या दुहेरीकरणाच्या प्रकल्पामुळे दिलासा मिळणार आहे. याशिवाय येथील विद्यार्थी, दैनंदिन प्रवासी व्यापारी शेतकरी पर्यटक अशा साऱ्यांनाच या मार्गाचा फायदा होणार आहे.

या प्रकल्पामुळे पुणतांबा तसेच शिर्डीमधील रेल्वे कनेक्टिव्हिटीला आणखी चालना मिळणार असून सोबतच या परिसरातील एकात्मिक विकास सुनिश्चित करता येणार आहे. हा रेल्वे प्रकल्प येथील स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा राहील असा सुद्धा विश्वास संबंधितांकडून व्यक्त केला जातोय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!