केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय ! 16,241 कोटी रुपयांच्या महाराष्ट्रातील ‘या’ 12 रेल्वे मार्गांना मंजुरी

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून 16,241 कोटी रुपयांच्या महाराष्ट्रातील 12 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. लोकसभेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Published on -

Maharashtra Railway : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. याचे कारण म्हणजे भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. याशिवाय रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार आहे. म्हणूनच बहुसंख्य लोक रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य दाखवतात.

यामुळे रेल्वे कडून रेल्वेचे नेटवर्क आणखी वाढवले जातात. देशातील अनेक भागांमध्ये नवनवीन रेल्वे मार्ग विकसित केले जात आहेत. महाराष्ट्रात देखील नवीन रेल्वे मार्ग विकसित केले जात असून काही रेल्वे मार्गांची क्षमता वाढवली जात आहे.

दरम्यान देशाचे आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमधील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्रातील मोदी सरकारने मुंबईमधील बारा रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. खरे तर सध्या केंद्रीय विधिमंडळाचे म्हणजेच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे.

याच पावसाळी अधिवेशनादरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच लोकसभेत मुंबईमधील 16,241 कोटी रुपयांच्या 12 रेल्वे मार्ग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. यामुळे मुंबईमधील कनेक्टिव्हिटी आणखी बळकट होईल, मुंबई लोकलची गर्दी कमी होईल, लोकलच्या फेऱ्या वाढतील असा आशावाद आता व्यक्त केला जातोय. 

मुंबईमधील या प्रकल्पांना केंद्राची मंजुरी

विरार – डहाणू रोड रेल्वे प्रकल्प : विरार ते डहाणू रोड दरम्यान तिसरी आणि चौथी लाईन टाकली जात आहे. हा 64 किलोमीटर लांबीचा प्रकल्प असून याचे काम एमयूटीपी-III अंतर्गत पूर्ण केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 3587 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

बोरिवली – विरार रेल्वे : बोरिवली ते विरार दरम्यान पाचवी आणि सहावी लाईन टाकली जात आहे. 26 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी 2184 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून याचे काम एमयूटीपी-III A अंतर्गत पूर्ण केले जात आहे.

गोरेगाव – बोरिवलीचा विस्तार : गोरेगाव बोरिवली पासून हार्बर लाइनचा विस्तार केला जाणार असून हा प्रकल्प सात किलोमीटर लांबीचा राहणार आहे. यासाठी 826 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

मुंबई सेंट्रल – बोरिवली रेल्वे : मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान सहावी लाईन टाकली जाणार असून यासाठी 919 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

सीएसएमटी – कुर्ला रेल्वे मार्ग : सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान पाचवी आणि सहावी लाईन टाकली जाणार आहे. हा मार्ग 17.5 किलोमीटर लांबीचा आहे. यासाठी 891 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

निळजे – कोपर : निळजे ते कोपर दरम्यानच्या पाच किलोमीटर लांबीवर डबल कॉर्ड लाईन टाकली जाणार असून हा प्रकल्प 338 कोटी रुपयांचा आहे. 

नायगाव – जुईचंद्र : नायगाव जुईचंद्र दरम्यान सहा किलोमीटर लांब डबल कॉर्ड लाईन टाकली जाणार आहे आणि यासाठी 176 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

कल्याण – कसारा : कल्याण ते कसारा या 67 किलोमीटरचा मार्गावर तिसरी लाईन टाकली जाणार आहे. हा प्रकल्प 793 कोटींचा आहे.

कल्याण – बदलापूर : कल्याण ते बदलापूर दरम्यान तिसरी आणि चौथी लाईन टाकली जाणार आहे. या चौदा किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी 1510 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

कल्याण – आसनगाव : कल्याण ते आसनगाव दरम्यान चौथी लाईन टाकली जाणार आहे. हा 32 किलोमीटर लांबीचा प्रकल्प असून 1759 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. 

रोली-कळवा (उन्नत) उपनगरीय कॉरिडॉर लिंक : रोली ते कळवा दरम्यान उन्नत उपनगरीय कॉरिडॉर लिंक विकसित होणार आहे. हा 3.3 किलोमीटर लांबीचा प्रकल्प आहे आणि यासाठी 476 कोटी रुपयांचा खर्च केला जाईल.

पनवेल -कर्जत उपनगरीय कॉरीडॉर : हा प्रकल्प 2782 कोटी रुपयांचा असून याची लांबी 29.6 किलोमीटर इतकी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!