महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी Good News ! राज्यातील ‘या’ 2 महत्त्वाच्या रेल्वे मार्गांना केंद्रातील सरकारची मंजुरी

महाराष्ट्रासहीत संपूर्ण भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. दरम्यान राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी केंद्रातील सरकारकडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Published on -

Maharashtra Railway : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आज केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. आज रेल्वेच्या पायाभूत सोयी सुविधा वाढवणाऱ्या महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांना केंद्रातील सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे.

त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता आपण केंद्रातील सरकारने कोणत्या दोन महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे आणि हे प्रकल्प कसे आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत.

केंद्रातील सरकारने या दोन प्रकल्पांना दिली मान्यता  

मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील मोदी सरकारने विदर्भातील नागपूर-इटारसी या रेल्वे मार्गावरील चौथ्या मार्गिकेला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील दळणवळण व्यवस्था आणखी मजबूत होईल आणि या प्रदेशाच्या एकात्मिक विकासाला हातभार लागेल अशी आशा आहे.

या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर या रेल्वे मार्गाची एकूण लांबी 295 किलोमीटर इतकी आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 5451 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प दिल्ली चेन्नई हाय डेन्सिटी नेटवर्कचा एक भाग असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

या प्रकल्पाचा फक्त महाराष्ट्रातील नागरिकांनाच फायदा होईल असे नाही तर महाराष्ट्रासहित मध्य प्रदेशातील नागरिकांसाठी देखील हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील नागपुर आणि मध्य नर्मदापुरम बैतूल आणि पंधुर्णा या जिल्ह्यातील विकासाला चालना मिळणार आहे.

याव्यतिरिक्त केंद्रातील सरकारने मराठवाड्यातील आणखी एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. छत्रपती संभाजीगनर ते परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्रातील सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रकल्प 2179 कोटी रुपयांचा प्रकल्प असून याची लांबी 177 किलोमीटर इतकी आहे.

या मार्गाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा मार्ग मुंबई आणि सिकंदराबाद दरम्यानचा पर्याय मार्ग आहे. हा मार्ग मराठवाड्यातील तीन महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील कृषी, शिक्षण, उद्योग, पर्यटन अशा विविध क्षेत्रांना चालना देणार आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी जिल्ह्यातील नागरिकांना या रेल्वे मार्ग प्रकल्पाचा फायदा होणार आहे. याव्यतिरिक्त मराठवाड्यातील इतरही पाच जिल्हे अप्रत्यक्षरीत्या या प्रकल्पामुळे लाभान्वित होतील. हा प्रकल्प मराठवाड्यासाठी मोठा गेम चेंजर ठरेल अशी आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!