Maharashtra Railway : मध्य रेल्वेने सर्वसामान्य नागरिकांना एक मोठी भेट दिली आहे. मध्य रेल्वे कडून काही नव्या विशेष एक्सप्रेस ट्रेन ची घोषणा करण्यात आली आहे. खरे तर जुलै महिन्यात श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारकऱ्यांचा मेळा सजणार आहे. 6 जुलै रोजी पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्ताने वारकऱ्यांची मोठी गर्दी होईल.
आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी पंढरपूरला जाणार आहेत आणि याचमुळे मध्य रेल्वेने वारकऱ्यांच्या सोयीसाठी काही विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. उधना ते मिरज, पंढरपूर ते हुबळी या दरम्यान विशेष गाडी चालवण्याची मोठी घोषणामध्ये रेल्वे कडून करण्यात आली आहे.

यामुळे पुणे, अहिल्यानगर सहित महाराष्ट्रातील काही प्रमुख जिल्ह्यांमधील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान आज आपण या विशेष गाड्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेणार आहोत.
उधना – मिरज विशेष गाडीचे वेळापत्रक कसे राहणार?
मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून उधना ते मिरज दरम्यान चार अतिरिक्त गाड्या चालवल्या जाणार आहेत. चार जुलै ते सहा जुलै दरम्यान या विशेष गाडीच्या चार अतिरिक्त फेऱ्या होणार आहेत.
महत्त्वाची बाब अशी की या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील बारडोली, व्यारा, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड,
कुर्डूवाडी आणि पंढरपूर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. म्हणजेच या गाडीचा उत्तर महाराष्ट्रातील तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना फायदा होणार आहे.
पंढरपूर- हुबळी विशेष गाडीचे वेळापत्रक कसे असणार?
मध्य रेल्वे प्रशासनाने पंढरपूर ते हुबळी दरम्यान विशेष गाडी चालवण्याची घोषणा केली आहे. गाडी क्रमांक 07313 अनारक्षित विशेष गाडी चार जुलै वगळता एक ते आठ जुलै दरम्यान सकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी हुबळी रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि त्याच दिवशी ही गाडी सायंकाळी चार वाजता श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे.
तसेच पंढरपूर हुबळी विशेष एक्सप्रेस ट्रेन म्हणजे गाडी क्रमांक 07314 ही अनारक्षित स्पेशल गाडी चार जुलै वगळता एक ते आठ जुलै दरम्यान पंढरपूर रेल्वे स्थानकावरून सायंकाळी सहा वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी पहाटे चार वाजता हुबळी रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
हुबळी ते पंढरपूर या गाडीच्या सात आणि पंढरपूर ते हुबळी या गाडीच्या 7 अशा या गाडीच्या एकूण 14 फेऱ्या होणार आहेत. रेल्वेने या विशेष गाडीला या मार्गावरील रवाड, अलनावर, लोंडा, खानापूर, देसूर, बेळगाव,
पाच्छापूर, गोकाक रोड, घटप्रभा, चिकोडी रोड, रायबाग, चिंचली, कुडची, उगार खुर्द, शेडबाल, विजयनगर, मिरज, अरग, ढालगाव, जत रोड, वसूद आणि सांगोला या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर केला आहे.