महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ‘या’ 79 Railway स्थानकावर मोफत वायफाय, मोफत वायफाय कसे कनेक्ट करायचे ?

राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी खुशखबर आहे. ही बातमी पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाची आहे. कारण की जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर आता मोफत वायफाय ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, आता आपण कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर मोफत वायफायची सुविधा उपलब्ध झाली आहे याची माहिती पाहणार आहोत.

Published on -

Maharashtra Railway : तुम्हीही रेल्वेने प्रवास करता का ? अहो मग आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. रेल्वेकडून प्रवाशांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरे तर, आपल्या महाराष्ट्रात आणि सबंध भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे.

भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क असून देशात जवळपास साडेसात हजाराहून अधिक रेल्वे स्थानक आहेत. यामुळे देशातील कोणत्याही कोपऱ्यात जायचे असेल तरी देखील रेल्वेचा पर्याय फायदेशीर ठरतो.

महत्त्वाची बाब अशी की रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणार आहे आणि हेच कारण आहे की सर्वसामान्य जनता नेहमीच रेल्वे प्रवासाला प्राधान्य दाखवते. दरम्यान, रेल्वे कडूनही प्रवाशांसाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

अशातच, आता राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेने एक मोठा निर्णय घेतलाय या निर्णयांतर्गत राज्यातील जवळपास 79 हून अधिक महत्त्वाच्या स्थानकावर मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या स्थानकावर मिळणार मोफत वायफाय

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे विभागातील 79 रेल्वे स्थानकावर मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने आपल्या 79 रेल्वे स्थानकांमध्ये मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय. खरे तर, मध्य रेल्वेच्या पुणे विभागात एकूण 102 रेल्वे स्थानक येतात यापैकी 79 रेल्वे स्थानकावर मोफत वायफायची सुविधा उपलब्ध झालेली आहे.

तर दुसरीकडे बाकीच्या रेल्वे स्थानकांमध्ये देखील ही सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांकडून उपस्थित केली जात असून याच मागणीच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागाकडून लवकरात लवकर मोफत वायफाय उपलब्ध करून दिला जाईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

नक्कीच बाकीच्या रेल्वे स्थानकांवर देखील मोफत वायफायची सुविधा उपलब्ध झाली तर पुणे विभागातुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

रेल्वेचे वायफाय कसे कनेक्ट करायचे ?

पुणे रेल्वे भागातील ज्या रेल्वेस्थानकावर मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तेथील मोफत वायफाय कनेक्ट करायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील किंवा लॅपटॉप मधील वायफाय सेटिंग मध्ये जावे लागेल.

मग तुम्हाला जे उपलब्ध वायफाय नेटवर्क दिसते त्या यादीतून रेल्वेचे वायफाय नेटवर्क निवडायचे आहे आणि तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी दिलेल्या रकान्यात भरायचा आहे आणि कनेक्ट बटणावर क्लिक करायचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News