महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी Good News ! ‘ह्या’ 2900 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर धावणार नवीन एक्सप्रेस, कुठून कुठपर्यंत धावणार? पहा..

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून एका नव्या ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. ही नवीन गाडी 2900 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर चालवली जाईल आणि आज आपण याच नव्या गाडीची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

Published on -

Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या माध्यमातून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण मध्य रेल्वेने राज्यातील तिरुपती बालाजी येथील भाविकांसाठी नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची मोठी घोषणा केली आहे. ही विशेष एक्सप्रेस ट्रेन 2900 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर धावणार असून या गाडीला राज्यातील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आलाय.

या गाडीला मराठवाड्यातील आणि उत्तर महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आलेला आहे. दरम्यान आता आपण दक्षिण मध्य रेल्वे कडून तिरुपती बालाजी साठी महाराष्ट्रातून चालवल्या जाणाऱ्या या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा राहणार रूट ?

दक्षिण मध्य रेल्वेने हिसार ते तिरुपती दरम्यान नव्या विशेष एक्सप्रेस ट्रेन ची घोषणा केली आहे. हिसार ते तिरुपती हा रेल्वेमार्ग 2900 किलोमीटर लांबीचा असून या रेल्वे मार्गावर नव्या विशेष एक्सप्रेस ट्रेन ची घोषणा करण्यात आली असल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या गाडीचा मोठा फायदा होईल अशी आशा आहे.

ही गाडी मराठवाड्यातील नांदेड व उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार मार्गे चालवली जाणार आहे. ही गाडी उत्तर आणि दक्षिण भारताला कनेक्ट करणार आहे. ही विशेष ट्रेन 22 डब्यांची असेल ज्यात स्लीपर, जनरल आणि एसी कोचेसचा समावेश राहील. 

वेळापत्रक कसे राहणार ?

रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार तिरुपती – हिसार विशेष ट्रेन 9 जुलै ते 24 सप्टेंबर 2025 या कालावधीत चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी तिरुपती रेल्वे स्थानकावरून दर बुधवारी रात्री 11:45 मिनिटांनी सोडली जाईल आणि शनिवारी दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी ही गाडी हीसार रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासात हिसार तिरुपती विशेष एक्सप्रेस ट्रेन 13 जुलै ते 28 सप्टेंबर 2025 या कालावधी चालवली जाणार असून या काळात ही गाडी दर रविवारी रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी हिसार रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता ही गाडी तिरुपती रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. 

कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार विशेष एक्सप्रेस ट्रेन 

हिसार ते तिरुपती दरम्यान चालवल्या जाणाऱ्या या विशेष एक्सप्रेस ट्रेनमुळे तिरुपती बालाजी येथे दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळेल. ही गाडी महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. या गाडीला राज्यातील नांदेड, अकोला, भुसावळ, जळगाव आणि नंदुरबार या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!