पुणे, सांगली, सातारा, अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ‘या’ मार्गावर चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन

महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मध्य रेल्वे कडून दोन नव्या रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. 

Published on -

Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुणे सांगली सातारा अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरे तर यावर्षी सहा जुलै रोजी आषाढी एकादशी साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे.

दरम्यान श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी रेल्वे कडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

आषाढी एकादशीला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वे कडून दोन नव्या एकेरी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. खरे तर पुणे ते मिरज आणि मिरज ते नागपूर या मार्गावर एकेरी विशेष गाडी चालवण्याची घोषणामध्ये रेल्वे कडून करण्यात आली आहे.

या नव्या विशेष एक्सप्रेस ट्रेन मुळे नक्कीच प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता आपण मध्य रेल्वेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या याच नव्या एकेरी विशेष एक्सप्रेस ट्रेन चा संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत.

पुणे – मिरज एकेरी विशेष गाडीचे वेळापत्रक 

पुणे – मिरज एकेरी विशेष रेल्वे गाडी अर्थातच गाडी क्रमांक 01413 हे आषाढी एकादशी विशेष गाडी आठ जुलै 2025 रोजी सकाळी सात वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि ही गाडी त्याच दिवशी दुपारी साडेबारा वाजता मिरज रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे ही गाडी या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार आहे. मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार या विषयाच्या एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील लोणंद सातारा कराड किर्लोस्करवाडी आणि सांगली या महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे.

या विशेष गाडीच्या रचनेबाबत बोलायचं झालं तर यात 2 AC 3-tier, 10 Sleeper, 4 General, 2 Second Seating with Brake Van अशी या गाडीची रचना राहणार आहे.

मिरज – नागपूर विशेष गाडीचे वेळापत्रक कसे राहणार 

 मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार मिरज – नागपूर एकेरी विशेष रेल्वे गाडी अर्थातच गाडी क्रमांक 01213 ही एकेरी विशेष गाडी आठ जुलै रोजी दुपारी बारा वाजून 55 मिनिटांनी मिरज रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे.

दरम्यान ही गाडी 9 जुलै रोजी 12 : 25 वाजता नागपूरला पोहोचणार आहे. महत्वाची बाब अशी की ही गाडी या मार्गावरील अरग, पंढरपूर, कुर्डूवाडी, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, यासह इतर महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe