Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाकडून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून जालना ते तिरुचानूर अशी विशेष रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या विशेष एक्सप्रेस ट्रेन च्या एकूण 14 फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या काळात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. ही गाडी साप्ताहिक राहणार आहे अर्थात आठवड्यातून एक दिवस चालवली जाईल. या गाडीचा मराठवाड्यातील प्रवाशांना फायदा होईल.

दिवाळीत ज्यांना तिरुपतीला दर्शनासाठी जायचे आहे त्यांच्यासाठी देखील ही विशेष एक्सप्रेस फायद्याची ठरणार आहे. दिवाळीच्या सुट्टीत तिरुपतीला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या फारच उल्लेखनीय असते आणि या भाविकांसाठी ही विशेष गाडी नक्कीच फायद्याची ठरू शकते.
दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक पाहूयात. तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार याबाबतही आज आपण या लेखातून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे राहणार वेळापत्रक?
ही विशेष गाडी उद्यापासून चालवली जाणार आहे. या गाडीची शेवटची फेरी 1 डिसेंबरला राहणार आहे. या काळात ही गाडी दर रविवारी जालना येथून सायंकाळी सात वाजून वीस मिनिटांनी सोडली जाणार आहे. तसेच तिरुचानूर येथून दर सोमवारी रात्री साडेअकरा वाजता सोडली जाणार आहे.
या दिवाळी स्पेशल गाडीच्या जालना तिरुचानूर 7 आणि तिरुचानूर जालना 7 अशा एकूण 14 फेऱ्या होणार आहेत. दरम्यान प्रवाशांनी या विशेष एक्सप्रेस ट्रेन चा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोणकोणत्या स्थानकावर थांबणार विशेष गाडी
परतूर
सेलू
परभणी जंक्शन
गंगाखेड
परळी वैजनाथ
लातूर
धाराशिव
बार्शी टाऊन
कुर्डुवाडी
सोलापूर
दुधनी
गणागापूर
कलबुर्गी
शहाबाद
वाडी
यादगीर
कृष्णा
रायचूर
मंत्रालयम रोड
अदोनी