महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! 1 जुलै 2025 पासून ‘या’ रेल्वे मार्गावर धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, वेळापत्रक कसे असणार?

राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली आहे. या गाडीचा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. ही गाडी मिरज ते कलबुर्गी दरम्यान चालवली जाईल आणि राज्यातील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर ही गाडी थांबा घेणार आहे.

Published on -

Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. एक जुलै 2025 पासून रेल्वे प्रवाशांसाठी एक नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून मिरज ते कलबुर्गी दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.

दरम्यान, आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार? याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.

मिरज – कलबुर्गी विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक

खरंतर आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी लाखोंच्या संख्येने गर्दी करतात. पुढील महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविक श्री क्षेत्र पंढरपूर येथे येणार आहेत आणि याच अनुषंगाने रेल्वे कडून मिरज – कलबुर्गी विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात येत आहे.

या विशेष गाडीच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर मिरज – कलबुर्गी – मिरज विशेष एक्सप्रेस ट्रेन 01 जुलै 2025 पासून सुरू केली जाणार आहे. मिरज कलबुर्गी विशेष एक्सप्रेस ट्रेन दररोज सकाळी पाच वाजता मिरज रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि ही गाडी दुपारी दीड वाजता कलबुर्गी रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

तसेच कलबुर्गी मिरज विशेष एक्सप्रेस ट्रेन दररोज कलबुर्गी येथून दुपारी साडेतीन वाजता सोडली जाणार आहे आणि ही गाडी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी मिरज रेल्वे स्टेशनवर पोहोचणार आहे.

खरेतर, सकाळच्या वेळेस कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी केली जात होती. शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने ही गाडी सुरू करण्याची आग्रही मागणी उपस्थित केली होती.

मुंबईतील मध्य रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत या संघटने कडून ही मागणी मांडण्यात आली. महत्त्वाची बाब अशी की कोल्हापूरहून शक्य नसल्यास मिरजहून ही गाडी सुरू करावी,

अन्यथा मिरज-कुर्डुवाडी डेमोचे विस्तार करून ती कलबुर्गीपर्यंत नेण्यात यावी, अशी सूचना सुद्धा या संघटनेकडून देण्यात आली. दरम्यान, याच मागणीची दखल घेत आता रेल्वे प्रशासनाने मिरज ते कलबुर्गी दरम्यान विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे.

विशेष गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबणार?

रेल्वेने सांगितल्याप्रमाणे ही विशेष गाडी या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार आहे. आरग, बेळंकी, सलगरे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव,

जवळा, वासूद, सांगोला, पंढरपूर, मोडनिंब, कुर्डुवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, अक्कलकोट, दुधनी, गाणगापूर अशा महत्त्वाच्या स्थानकांवर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!