जुलै महिन्यात महाराष्ट्रात सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन! राज्यातील ‘ह्या’ 18 रेल्वे स्थानकावर थांबणार

राज्यातील विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे कडून एक नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे.

Published on -

Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे पुढील महिन्यात अर्थातच जुलै महिन्यात एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय रेल्वे कडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुढील महिन्यात आषाढी एकादशी आहे आणि याचा आषाढी एकादशीच्या निमित्ताने देशभरातील वारकरी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे एकवटणार आहेत.

विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे येतील. दरम्यान याच वारकऱ्यांच्या सोयीसाठी रेल्वे कडून एक नव्या एक्सप्रेस ट्रेन ची सुरुवात करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विदर्भातील वारकऱ्यांसाठी रेल्वे कडून नवीन अमरावती ते पंढरपूर अशी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. ही एक्सप्रेस ट्रेन जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चालवली जाईल आणि यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान आता आपण नवीन अमरावती ते पंढरपूर दरम्यान चालवली जाणारी ही विशेष एक्सप्रेस ट्रेन कशी असणार? याचा रूट कसा असेल? ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबणार, याचे वेळापत्रक कसे असेल? या साऱ्या बाबींचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

नवीन अमरावती ते पंढरपूर विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक 

मिळालेल्या माहितीनुसार नवीन अमरावती पंढरपूर विशेष एक्सप्रेस ट्रेन म्हणजेच ट्रेन क्रमांक ०१११९ ही गाडी २ आणि ५ जुलै रोजी नवीन अमरावती रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे. या दोन्ही दिवशी ही गाडी दुपारी २.४० वाजता नवीन अमरावतीहून सोडली जाईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.१० वाजता ही विशेष एक्सप्रेस ट्रेन पंढरपूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

या गाडीच्या प्रतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर पंढरपूर नवीन अमरावती विशेष एक्सप्रेस ट्रेन म्हणजे ट्रेन क्रमांक ०११२० ही विशेष गाडी ३ जुलै आणि ६ जुलै रोजी पंढरपूर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे.

या दोन्ही दिवशी ही गाडी पंढरपूर रेल्वे स्थानकावरून संध्याकाळी साडेसात वाजता रवाना होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी नवीन अमरावतीला पोहोचणार आहे. 

कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार विशेष एक्सप्रेस 

 रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार नवीन अमरावती ते पंढरपूर दरम्यान धावणारी नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. या विशेष गाडीला या मार्गावरील बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर,

दौंड आणि कुर्डुवाडी स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. म्हणजेच ही गाडी या मार्गावरील तब्बल 18 महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार आहे आणि यामुळे या संबंधित रेल्वे स्टेशन वरून ये – जा करणाऱ्या प्रवाशांना सुद्धा या गाडीचा फायदा होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News