Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्रातील प्रमुख 10 रेल्वे स्थानकावरून आता नवीन एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे. रेल्वेच्या सोलापूर विभागाने एक अगदीच महत्त्वाचा निर्णय घेतला असून पुणे ते नांदेड या मार्गावर होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता हडपसर – नांदेड अशी विशेष गाडी चालवली जाणार आहे.
यामुळे हडपसर ते नांदेड हा प्रवास वेगवान होणार असून आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक तसेच ही गाडी राज्यातील कोणत्या दहा महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणाऱ ? या संदर्भातील माहिती आजच्या या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कस असणार वेळापत्रक
हडपसर – नांदेड विशेष गाडी लातूर – कुर्डूवाडी मार्गावर धावणार असून यामुळे या मार्गावर होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी नियंत्रणात राहण्यास मदत मिळणार आहे. हडपसर – नांदेड तसेच नांदेड – हडपसर स्पेशल ट्रेन 18 आणि 25 नोव्हेंबर 2025 रोजी चालवली जाणार आहे.
ही गाडी आठवड्यातून एक दिवस चालवली जाणार आहे. नांदेड–हडपसर साप्ताहिक विशेष गाडी 18 आणि 25 नोव्हेंबरला नांदेडहून सकाळी 08:30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 09:40 वाजता हडपसर स्थानकात पोहोचणार आहे.
वाढत्या प्रवासी गर्दीला दिलासा देण्यासाठी ही गाडी महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा पर्याय उपयुक्त ठरेल.
दरम्यान, हडपसर–नांदेड साप्ताहिक विशेष गाडी देखील त्याच दिवशी म्हणजेच 18 आणि 25 नोव्हेंबर रोजी हडपसरहून रात्री 10:50 वाजता सुटणार अन ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी 12:15 वाजता नांदेडला पोहोचणार आहे.
ह्या दोन्ही गाड्यांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. या विशेष गाड्यांमुळे नांदेड-पुणे मार्गावरील प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोणत्या स्थानकावर घेणार थांबा ?
या गाडीला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक महत्त्वपूर्ण स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला आहे. ही गाडी मार्गावरील महत्त्वपूर्ण अशा 10 स्थानकावर थांबा घेणार असून यामुळे राज्यातील प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे.
पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी टाउन, कुर्डुवाडी आणि दौंड या रेल्वे स्टेशनवर विशेष गाडीला थांबा मंजूर करण्यात आला आहे.













