महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! गोव्याला पोहचण झालं सोपं ; ‘या’ 8 रेल्वे स्थानकावरून धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन !

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी विशेषता कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता गोव्याला जाणं सोपं होणार आहे. कारण की, रेल्वे कडून एका विशेष एक्सप्रेस ट्रेनला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Published on -

Maharashtra Railway : भारतातील रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. देशात जवळपास साडेसात हजार रेल्वे स्थानक तयार आहेत. महत्त्वाचे बाब म्हणजे भारतातील रेल्वेचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढवले जात आहे, यासाठी नवनवीन रेल्वे मार्ग विकसित केले जात आहेत आणि नवनवीन स्थानकेही विकसित होत आहेत.

दुसरीकडे रेल्वे बोर्डाकडून प्रवाशांसाठी नवनवीन रेल्वेगाड्या सुद्धा सुरू केल्या जात आहेत. दरम्यान उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तसेच सणासुदीच्या काळात रेल्वे कडून विशेष गाड्या देखील चालवल्या जात आहेत.

या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये देखील रेल्वेने अशाच अनेक विशेष गाड्या सुरू केलेल्या आहेत. गोवा ते बिहार दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी देखील रेल्वे कडून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली आहे.

हे अतिरिक्त रेल्वेगाडी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालवले जाणार होती मात्र या गाडीला प्रवाशांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय आणि या मार्गावरील प्रवाशांची गर्दी वाढतच आहे म्हणून ह्या गाडीला आता मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे कडून ही विशेष गाडी आता जून अखेरपर्यंत चालवली जाणार असल्याची खात्रीलायक बातमी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.

किती मुदतवाढ मिळाली? 

 उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे कडून वास्को द गामा – मुझफ्फरपूर – वास्को द गामा ही विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली होती. यातील वास्को-द-गामा मुजफ्फरपुर विशेष एक्सप्रेस ट्रेन म्हणजेच गाडी क्रमांक 07311 दोन जून 2025 पर्यंत चालवली जाणार होती मात्र आता या गाडीला जून अखेरपर्यंत चालवली जाणार आहे.

ही गाडी 23 जून पर्यंत चालवली जाणार आहे. याशिवाय मुजफ्फरपुर – वास्को द गामा विशेष एक्सप्रेस ट्रेन म्हणजेच गाडी क्रमांक 07312 पाच जून 2025 पर्यंत चालवली जाणार होती मात्र आता या गाडीला 26 जून पर्यंत चालवले जाणार आहे. यामुळे कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या महाराष्ट्रातील प्रवाशांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. 

कसं आहे वेळापत्रक

वास्को द गामा ते मुझफ्फरपूर एक्स्प्रेस नऊ जून ते 23 जून 2025 पर्यंत दर सोमवारी वास्को द गामा रेल्वे स्थानकावरून दुपारी चार वाजता रवाना होणार आहे आणि तिसऱ्या दिवशी दुपारी साडेबारा वाजता आपल्या गंतव्य स्थानावर पोहोचणार आहे.

तसेच मुजफ्फरपुर ते वास्को-द-गामा एक्सप्रेस 12 जून ते 26 जून 2025 पर्यंत दर गुरुवारी मुझफ्फरपुर रेल्वे स्थानकावरून दुपारी पाऊणे तीन वाजता सोडली जाणार आहे आणि तिसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजून 55 मिनिटांनी ही गाडी आपल्या गंतव्य स्थानावर पोहोचणार आहे.

कुठे – कुठे थांबणार विशेष एक्सप्रेस ट्रेन 

रेल्वेने सांगितल्याप्रमाणे, गोवा आणि बिहार या दोन राज्यांना जोडणारी ही विशेष एक्सप्रेस ट्रेन या मार्गावरील मडगाव, थिवि, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, मनमाड, भुसावळ, खंडवा जंक्शन, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News