Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली असूनही गाडी राज्यातील 10 रेल्वे स्थानकांमध्ये थांबा घेणार आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
खरंतर सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे विविध रेल्वे मार्गांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. अतिरिक्त गर्दीमुळे प्रवाशांना तिकीट सुद्धा मिळत नाहीये. यामुळे त्यांना इतर पर्यायी वाहतुकीचा वापर करावा लागत असून हीच बाब विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान रेल्वे कडून सुरू करण्यात आलेली ही नवीन एक्सप्रेस ट्रेन राज्याच्या उत्तरेकडील आणि विदर्भातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकामधून धावणार आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांना या गाडीचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
या मार्गावर धावणार नवीन एक्सप्रेस
रेल्वेने सांगितल्याप्रमाणे एमजीआर चेन्नई सेंट्रल ते राजस्थान येथील जोधपुर येथील भगत की कोठी या स्थानकादरम्यान नवीन एक्सप्रेस चालवली जाणार आहे.
चेन्नई ते जोधपुर दरम्यान चालवली जाणारी ही गाडी या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. महाराष्ट्रातील जवळपास दहा रेल्वे स्थानकांवर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला आहे.
नव्या एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक कसे आहे?
एमजीआर चेन्नई सेंट्रल – भगत की कोठी (गाडी क्रमांक 20625) ही नवीन एक्सप्रेस दोन दिवस वगळता संपूर्ण आठवडाभर चालवली जाणार आहे.
सोमवार मंगळवार गुरुवार शुक्रवार आणि रविवारी ही गाडी चेन्नई सेंट्रल येथून संध्याकाळी पावणे आठ वाजता सोडली जाणार आहे आणि तिसऱ्या दिवशी दुपारी सव्वा बारा वाजता ही गाडी भगत की कोठी येथे पोहोचणार आहे.
तसेच, भगत की कोठी – चेन्नई सेंट्रल ट्रेन (गाडी क्रमांक 20626) ही नवीन एक्सप्रेस ट्रेन भगत की कोठी येथून आठवड्यातून पाच दिवस सोडली जाणार आहे.
ही ट्रेन रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता भगत की कोठी इथून निघणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्री सव्वा अकरा वाजता ही गाडी चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
कोण – कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार नवीन एक्सप्रेस
ही नवीन एक्सप्रेस ट्रेन राज्यातील दहा महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. बल्हारशाह, चंद्रपूर, वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रातील आणि विदर्भातील महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे कडून समोर आली आहे.