Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. उद्या अर्थातच पाच जुलै 2025 रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी दक्षिण मध्य रेल्वे तर्फे एक विशेष गाडी चालवली जाणार आहे. दरवर्षी आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारकऱ्यांचा मोठी गर्दी पाहायला मिळते.
यंदा देखील श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्ताने वारकऱ्यांची मोठी गर्दी होणार आहे. दरम्यान यावर्षी वारकऱ्यांच्या सुविधेसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या हुजूर साहेब नांदेड विभागाच्या माध्यमातून पाच जुलै 2025 रोजी नागरसोल ते मिरज दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार आहे.

ही गाडी छत्रपती संभाजीनगर मार्गे धावणार असून या गाडीला या मार्गावरील तब्बल 16 महत्त्वाच्या स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक कसे आहे तसेच ही गाडी कोणकोणत्या महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार ? याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक ?
दक्षिण मध्य रेल्वेच्या हुजूर साहेब नांदेड विभागातर्फे गाडी क्रमांक 07515 ही विशेष एक्सप्रेस ट्रेन शनिवारी अर्थातच 5 जुलै 2025 रोजी नागरसोल रेल्वे स्थानकावरून रात्री सात वाजता सोडली जाणार आहे आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजून 55 मिनिटांनी ही गाडी मिरज रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
ही गाडी छत्रपती संभाजीनगर मार्गे चालवली जाणार असून छत्रपती संभाजी नगर रेल्वे स्थानकावर ही गाडी पाच जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता पोहोचणार आहे. या गाडीला छत्रपती संभाजी नगर रेल्वे स्थानकावर पाच मिनिटांसाठी थांबा मंजूर करण्यात आला आहे.
परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर गाडी क्रमांक 07516 ही विशेष एक्सप्रेस ट्रेन सहा जुलै 2025 रोजी मिरज रेल्वे स्थानकावरून सायंकाळी 5:25 मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता ही गाडी नागरसोल रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. या विशेष गाडीची नागरसोल ते मिरज अशी एक फेरी आणि मिरज ते नागरसोल अशी एक फेरी म्हणजेच दोन फेऱ्या होणार आहेत.
कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार विशेष एक्सप्रेस ?
नागरसोल ते मिरज दरम्यान चालवल्या जाणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेनला रोटेगाव, लासूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी, कुडूवाडी, पंढरपूर या रेल्वे स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून देण्यात आली आहे.