Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सध्या देशात होळीची चर्चा सुरू आहे आणि होळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील आता वाढली आहे. दरम्यान जर तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
खरे तर रेल्वे विभागाकडून होळी सणाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या मार्गांवर स्पेशल गाड्या सुरू केल्या जात आहेत. आतापर्यंत मध्य रेल्वेने आणि कोकण रेल्वेने अनेक विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. पश्चिम रेल्वेने देखील प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर काही विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.

पश्चिम रेल्वेतर्फे उधना-मालदा टाउन-उधना विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे. ही ट्रेन उत्तर महाराष्ट्रातून धावणार असून या गाडीला उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर सुद्धा थांबा मंजूर करण्यात आला आहे.
भुसावळ समवेत उत्तर महाराष्ट्रातील अन्य काही महत्त्वाच्या स्थानकावर देखील ही गाडी थांबणार आहे. दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबणार यासंदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
उत्तर महाराष्ट्रातून धावणाऱ्या विशेष ट्रेन चे वेळापत्रक कसे राहील?
पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०३४१८ उधना-मालदा टाउन ही विशेष रेल्वे ८ आणि २४ मार्च रोजी धावणार आहे. ही विशेष गाडी या दोन्ही दिवशी उधना स्टेशनवरून दुपारी १२.३० वाजता सोडली जाणार आहे आणि ही गाडी मालदा येथे तिसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचणार आहे. त्याचबरोबर ०३४१७ मालदा टाउन-उधना ही रेल्वे १६ मार्च आणि २२ मार्च रोजी मालदा टाउन रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे.
कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार
पश्चिम रेल्वेचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. परंतु ही गाडी जळगावला थांबणार नाही.
जळगाव हे उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून या ठिकाणी या गाडीला थांबा मिळायला हवा होता. मात्र पश्चिम रेल्वेने या ठिकाणी या गाडीला थांबा दिलेला नाही आणि यामुळे या भागातील प्रवाशांच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच या गाडीला जळगावात थांबा मंजूर झाला पाहिजे अशी मागणी देखील केली जात आहे. परंतु ही गाडी उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार दोंडाईचा अमळनेर आणि भुसावळ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
ही विशेष गाडी या मार्गावरील चालठाणा, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा, पाटणा, बख्तियारपूर, किउल, अभयपूर, जमालपूर, सुलतानगंज, भागलपूर, कहालगाव, साहिबगंज, बरहरवा आणि न्यू फरक्का या स्थानकांवर थांबा घेणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.