मे महिना मुंबईकरांसाठी ठरणार स्पेशल ! 06 मे 2025 पासून ‘या’ मार्गावर धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, 13 Railway Station वर थांबणार

Published on -

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे.

कारण की, उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून मुंबईवरून एक समर स्पेशल ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाचा हजारो रेल्वे प्रवाशांना फायदा होणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे.

खरे तर, उन्हाळी हंगामात प्रवाशांची होणारी गर्दी पाहता मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून नियमित गाड्या व्यतिरिक्त काही विशेष गाड्या सुद्धा चालवल्या केल्या जात आहेत. राजधानी मुंबईवरून देखील समर स्पेशल ट्रेन चालवल्या जात आहेत.

अशातच मुंबई ते सुलतानपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आला असून या विशेष गाडीच्या एकूण 16 फेऱ्या होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक, तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकात थांबा घेणार या संदर्भातील सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कस असणार वेळापत्रक?
मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मुंबई ते सुलतानपूर दरम्यान धावणारी विशेष गाडी मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते सुलतानपूर रेल्वे स्थानकादरम्यान चालवली जाणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते सुलतानपूर (गाडी क्रमांक 04211) ही समर स्पेशल ट्रेन 6 मे 2025 ते 24 जून 2025 या काळात चालवली जाणार आहे.

ही गाडी या काळात दर मंगळवारी 16.35 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रवाना होणार आहे आणि सुलतानपूर येथे दुसऱ्या दिवशी 23.00 वाजता पोहोचणार आहे. म्हणजेच या गाडीच्या मुंबई ते सुलतानपूर अशा आठ फेऱ्या होतील. तसेच गाडी क्रमांक 04212 ही विशेष गाडी 5 मे 2025 ते 23 जून 2025 या कालावधीत दर सोमवारी सुलतानपूर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे.

या काळात ही गाडी सोमवारी सुलतानपूर येथून चार वाजता सोडली जाणार आहे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 14.00 वाजता पोहोचणार आहे. म्हणजेच या गाडीच्या सुद्धा आठ फेऱ्या होणार आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते सुलतानपूर समर स्पेशल ट्रेनच्या 8 आणि सुलतानपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस समर स्पेशल ट्रेनच्या 8 अशा एकूण 16 फेऱ्या या कालावधीत चालवल्या जाणार असून यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल अशी आशा जाणकारांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार समर स्पेशल ट्रेन
मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ही समर स्पेशल ट्रेन महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. ही गाडी या मार्गावरील एकूण 13 महत्त्वाच्या स्थानकावर थांबणार असून यामध्ये राज्यातील अनेक महत्त्वाच्या स्थानकांचा सुद्धा समावेश आहे.

यामध्ये मुंबई नजीकच्या स्थानकांचा आणि उत्तर महाराष्ट्रातील स्थानकांचा समावेश होतो. सेंट्रल रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटल्याप्रमाणे मुंबई ते सुलतानपूर दरम्यान चालवली जाणारी समर स्पेशल ट्रेन ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ,

खंडवा, इटारसी जंक्शन, रानी कमलापति, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, उरई, कानपुर सेंट्रल आणि लखनऊ या स्थानकावर थांबा घेणार असून या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या विशेष गाडीचा अधिका-अधिक लाभ घ्यावा असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe