Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे रेल्वे कडून चार जुलैपासून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. ही गाडी मराठवाड्यातून चालवली जाणार आहे.
मराठवाड्यातील नांदेड रेल्वे स्थानकावरून ही नवी गाडी चालवली जाणार असून यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आशा आहे. खरे तर मराठवाड्यातील अनेक जण तिरुपती येथे बालाजीच्या दर्शनासाठी जात असतात.

दरम्यान, याच तिरुपती बालाजीला दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे कडून नांदेड ते तिरुपती दरम्यान दोन विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे नांदेड सहित संपूर्ण मराठवाड्यातील भाविकांना दिलासा मिळेल अशी आशा असून आज आपण याच विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक जाणून घेणार आहोत.
कसे असणार वेळापत्रक?
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून नांदेड ते तिरुपती दरम्यान चार जुलै ते 27 जुलै 2025 या काळात विशेष गाडी ( गाडी क्रमांक 07189/07190) चालवली जाणार आहे.
या काळात नांदेड तिरुपती विशेष एक्सप्रेस ट्रेन (गाडी क्रमांक 07189) नांदेड रेल्वे स्थानकातून शुक्रवारी दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी रवाना होणार आहे.
तसेच तिरुपती नांदेड विशेष एक्सप्रेस ट्रेन (गाडी क्रमांक 07190) तिरुपती रेल्वे स्थानकातून शनिवारी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी सोडली जाणार आहे. दुसरी विशेष गाडी (गाडी क्रमांक 07015) नांदेड येथून शनिवारी सायंकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी सोडली जाणार आहे.
तसेच तिरुपती नांदेड विशेष एक्सप्रेस ट्रेन म्हणजेच गाडी क्रमांक 07016 तिरुपती रेल्वे स्थानकातून रविवारी सायंकाळी चार वाजून 40 मिनिटांनी सोडले जाणार आहे.
विशेष गाड्या कोणत्या स्थानकावर थांबणार
मिळालेल्या माहितीनुसार नांदेड येथून चालवल्या जाणाऱ्या या दोन्ही विषयाचे गाड्या या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार आहेत. मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, कामारेड्डी, मेडचल, चेरलापल्ली,
नलगोंडा, मिर्यालागुडा, नाडीकुडे, पिदुगुरल्ला, नेमलीपुरी, रोमपिचेर्ला, विनुकोंडा, डोनाकोंडा, मरकापूरम रोड, कुंबम, गिद्दलूर, दिगुवामेट्टा, नंदयाल, जम्मालामादुगु, येरागुंतला, कडप्पा, नांदलूर, रझाम्पेटा,
कोदुरू आणि रेनिगुंटा या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर या गाड्यांना थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे कडून देण्यात आली आहे. नक्कीच या निर्णयामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.