महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना 16 मार्चला मिळणार गुड न्युज ! मुंबईहुन ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, राज्यातील 17 Railway स्थानकावर थांबणार

येत्या काही दिवसांनी देशात होळीचा सण साजरा होणार आहे. 14 मार्च 2025 रोजी यावर्षी होळीचा सण साजरा होणार आहे आणि या सणाला अनेक जण आपल्या गावी परतणार आहेत. अशा परिस्थितीत रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढणार अशी शक्यता आहे आणि याच अनुषंगाने भारतीय रेल्वे कडून वेगवेगळ्या मार्गांवर स्पेशल गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

Published on -

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी होळी सणाच्या आधीचं एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. महत्वाचे म्हणजे जेव्हा केव्हा सणासुदीचा हंगाम येतो तेव्हा रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या नेहमीच्या तुलनेत अधिक वाढत असते.

दरम्यान, येत्या काही दिवसांनी देशात होळीचा सण साजरा होणार आहे. 14 मार्च 2025 रोजी यावर्षी होळीचा सण साजरा होणार आहे आणि या सणाला अनेक जण आपल्या गावी परतणार आहेत. तसेच होळी सणाला सुट्टीचे औचित्य साधून अनेक जण पिकनिकचा प्लॅन सुद्धा बनवत आहे.

अशा परिस्थितीत रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढणार अशी शक्यता आहे आणि याच अनुषंगाने भारतीय रेल्वे कडून वेगवेगळ्या मार्गांवर स्पेशल गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. अशातच मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे विभागाकडून एक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही गाडी मुंबईहून गोव्यापर्यंत चालवले जाणार आहे. यामुळे मुंबई ते गोवा असा प्रवास वेगवान होणार असून याचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

होळी सणाच्या निमित्ताने मुंबई गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुरळीत आणि आरामदायी व्हावा, यासाठी मध्य रेल्वे अनेक मार्गांवर अतिरिक्त गाड्या चालवणार आहे. एलटीटी ते मडगाव या मार्गावर सुद्धा स्पेशल गाडी चालवली जाणार आहे.

मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान विशेष ट्रेन सुरू होणार असून या गाडीचा मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा होईल. अशा परिस्थितीत आज आपण या विशेष एक्स्प्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार ? याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं असणार वेळापत्रक?

एलटीटी ते मडगाव ( गाडी क्रमांक 01103 ) ही स्पेशल गाडी 17 मार्च रोजी आणि 24 मार्च रोजी सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोडली जाणार आहे आणि त्याच दिवशी ही गाडी रात्री 9:40 मिनिटांनी मडगावला पोहोचणार आहे.

तसेच, गाडी क्रमांक 01104 ही विशेष ट्रेन 16 मार्च रोजी आणि 23 मार्च रोजी दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी मडगाव येथून सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे.

विशेष गाडी कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार?

मध्य रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मुंबई ते मडगाव दरम्यान सुरू केल्या जाणाऱ्या या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे मुंबई ते गोवा दरम्यानचा प्रवास नक्कीच सुपरफास्ट होणार आहे आणि प्रवाशांना या गाडीचा चांगला फायदा होताना दिसेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe