Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी विदर्भातील नागरिकांसाठी तसेच विदर्भात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे.
कारण की मध्य रेल्वे मार्गावरील एका महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास होतोय. सध्या या रेल्वे स्थानकाचे काम अगदीच युद्ध पातळीवर सुरू असून येत्या काही दिवसांनी हे काम पूर्ण होणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील नागपूर येथील अजनी येथील रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. दरम्यान आज आपण या नव्या रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार? याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.
कधी पूर्ण होणार पुनर्विकासाचा प्रकल्प
खरंतर जून 2024 पर्यंत या रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम 30 टक्के पूर्ण झाले होते. त्यानंतरही या रेल्वे प्रकल्पाचे काम अगदीच युद्ध पातळीवर सुरु राहिले अन आता याचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे.
या प्रकल्पासाठी 297 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करून देण्यात आली आहे. म्हणजेच जवळपास तीनशे कोटी रुपयांचा खर्च करून हे रेल्वे स्थानक विकसित केले जाणार आहे. या स्थानकाचे काम रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण केले जात आहे.
केंद्रातील मोदी सरकारने देशातील विविध रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी एक विशेष योजना हाती घेतली आहे. याच योजनेच्या अंतर्गत अजनी रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास केला जात असून यामुळे या रेल्वे स्टेशनला एक नवीन रुप प्राप्त होत आहे.
यामुळे अजनी रेल्वे स्थानकावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. या रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर येथून दररोज 45 ते 50 हजार प्रवासी आवागमन करतील अशी माहिती देण्यात आली आहे.
या रेल्वे स्थानकावर पुनर्विकास प्रकल्प अंतर्गत तब्बल 10 मीटर रुंदीचे दोन एफबीओ बांधले जात आहेत ज्याला ट्रॅव्हलेटर्स संलग्न राहणार आहेत. या रेल्वे स्थानकावरील प्रत्येक प्लॅटफॉर्मला एस्केलेटर, लिफ्ट आणि जिना अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
ऑटो, कार, टॅक्सीसाठी 3679 चाैरस मीटरची प्रशस्त पार्किंग देखील राहणार आहे. एवढेच नाही तर या रेल्वे स्टेशन वरून आगमन करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी ड्रॉप आणि पिकअप झोन हे वेगळे राहणार आहेत.
यामुळे विदर्भातील रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. या रेल्वे विकासाच्या पुनर्विकासाची जबाबदारी असणाऱ्या प्राधिकरणाच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम सप्टेंबर 2025:पर्यंत पूर्ण होऊ शकते असा दावा करण्यात आला आहे.
या प्रकल्पाच्या कामासाठी जानेवारी 2026 ही डेडलाईन निश्चित करण्यात आली होती. मात्र याचे काम डेडलाईनच्या आधीच पूर्ण होईल अशी शक्यता आहे.