मोठी बातमी ! महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा, ‘या’ शहरात तयार होणार नवीन रेल्वेस्थानक

Published on -

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई शहराला लवकरच एका नव्या रेल्वेस्थानकाची भेट मिळणार आहे. मुंबईला मिळणाऱ्या या नव्या रेल्वेस्थानकामुळे प्रवाशांचा प्रवास आणखी सोयीचा होईल अशी आशा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिखलोली येथे हे नवीन स्थानक विकसित होणार आहे. बदलापूर आणि अंबरनाथ या दोन महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान हे स्थानक विकसित होईल आणि यामुळे या दोन्ही रेल्वे स्थानकांचा भार काही प्रमाणात कमी होईल आणि प्रवाशांना नक्कीच वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार असा विश्वास व्यक्त केला जातोय.

चिखलोली व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी हे रेल्वे स्थानक नक्कीच फायद्याचे ठरणार आहे. या परिसरातील नागरिकांचा लोकल प्रवास या निमित्ताने सोयीचा होईल असा विश्वास व्यक्त होतोय.

मुंबईच्या लोकलला ‘लाईफलाईन’ म्हटलं जात असलं, तरी वाढत्या प्रवाशांच्या ताणामुळे गर्दीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्पांपैकी एक महत्त्वाची प्रगती समोर आली आहे.

कल्याण–बदलापूरदरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याचे काम जोरात सुरू असून, या मार्गावरील नव्या स्थानकाचे बांधकामही गती घेत आहे. मध्य रेल्वे आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून एमयूटीपी-3 ए अंतर्गत हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे.

यासाठी 1,510 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च असून, अधिकृत माहितीनुसार सध्या या कामाचे सुमारे 30% बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू असून, नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.

या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे लोकल ट्रेनची क्षमता वाढणार आहे. गाड्यांची वारंवारता वाढल्याने प्रवास अधिक जलद आणि सुरळीत होणार असून, गर्दीतून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विठ्ठलवाडी, उल्हासनगर आणि अंबरनाथ स्थानकांवर प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्प अंतर्गत चिखलोली येथे नवं स्थानक बांधल जाणार आहे. अंबरनाथ आणि बदलापूरदरम्यान उभारले जाणारे हे नवे स्टेशन या परिसरातील प्रवास व्यवस्था मोठ्या प्रमाणात बदलू शकते.

स्टेशन इमारतीचा पहिल्या मजल्याचा स्लॅब तयार झाला असून उर्वरित बांधकाम वेगाने सुरू आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चिखलोली स्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या नव्या स्थानकामुळे अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकांवरील दबाव कमी होण्याची शक्यता आहे.

वाढत्या लोकसंख्येला पर्यायी थांबा उपलब्ध होणार असून लोकल प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित होईल. एकूणच, चिखलोली स्टेशन आणि तिसरी-चौथी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर कल्याण–बदलापूर मार्गावरील वाहतूक अधिक सोयीस्कर, जलद आणि गर्दीविरहित करण्यास मोठी मदत होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe