रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! हैदराबाद – अजमेर दरम्यान चालवली जाणार नवीन रेल्वेगाडी, महाराष्ट्रातील या 8 स्थानकावर थांबा मंजूर

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दक्षिण मध्ये रेल्वे कडून हैदराबाद ते अजमेर दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून ही गाडी महाराष्ट्रातून धावणार आहेत.

या गाडीला राज्यातील आठ महत्त्वाच्या स्टेशनवर थांबा सुद्धा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे अजमेर शरीफ येथे उरूसनिमित्त भेट देणाऱ्या भाविकांना या रेल्वे गाडीचा सर्वाधिक लाभ होणार आहे.

याशिवाय उज्जैन, चितोडगड येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना देखील या विशेष गाडीचा लाभ होणार असून जर तुमचाही राजस्थान ट्रिपचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी ही गाडी फायद्याची ठरू शकते.

दरम्यान आता आपण दक्षिण मध्य रेल्वेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या हैदराबाद – अजमेर विशेष एक्सप्रेस ट्रेन बाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

कस असणार वेळापत्रक?

अजमेर येथील जगप्रसिद्ध उरुसाला दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. राजस्थानातील या मुस्लिम धर्मियांच्या पवित्र तीर्थक्षेत्राला जगभरातील भाविक भेटी देत असतात. महाराष्ट्रातूनही अनेक भाविक येथे उरुसाला हजेरी लावतात.

अशा स्थितीत रेल्वे प्रशासनाने भाविकांची अतिरिक्त गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी हैदराबाद – अजमेर विशेष गाडी चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की 23 डिसेंबर 2025 रोजी हैदराबाद येथून ही विशेष गाडी सकाळी साडेअकरा वाजता सोडली जाणार आहे आणि गुरुवारी पहाटे ही गाडी अजमेर येथे पोहोचेल. ही गाडी मराठवाडा आणि विदर्भातून धावणार आहे.

परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर शनिवारी म्हणजेच 27 डिसेंबर रोजी सायंकाळी अजमेर येथून विशेष गाडी सोडली जाणार आहे आणि ही गाडी सोमवारी सकाळी हैदराबाद येथे पोहोचणार आहे. 

कोण कोणत्या स्थानकावर थांबणार 

ही विशेष गाडी या मार्गावरील एकूण 18 रेल्वे स्टेशनवर थांबा घेणाऱ्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. विशेष बाब अशी की राज्यातील आठ महत्त्वाच्या स्थानकावर या गाडीला थांबा मंजूर झाला आहे.

राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागातील महत्त्वाच्या स्थानकावर ही गाडी थांबणार असल्याने या विभागातील प्रवाशांना नक्कीच या गाडीचा मोठा लाभ मिळणार आहे.

दक्षिण मध्य रेल्वेने या विशेष गाडीला सिकंदराबाद, कामारेड्डी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, खांडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, रतलाम आणि चित्तोडगड अशा महत्त्वाच्या स्टेशनवर थांबा मंजूर केलाय.