महाराष्ट्रातील सोलापूरमधून ‘या’ शहरासाठी चालवली जाणार नवीन रेल्वेगाडी ! 26 रेल्वे स्थानकावर थांबणार

राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू केली आहे. या नव्या एक्सप्रेस ट्रेन मुळे तिरुपती बालाजी येथे दर्शनाला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास वेगवान होणार आहे.

Published on -

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी विशेषता पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी सोलापूरसह धाराशिव आणि मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. रेल्वे प्रशासनाने सोलापूर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील तिरुपती बालाजीच्या भक्तांसाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू केली आहे.

रेल्वे प्रशासनाने सोलापूर ते धर्मावरमपर्यंत नवीन साप्ताहिक विशेष गाडी सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. खरंतर सुरुवातीला रेल्वे कडून सोलापूर ते तिरुपतीपर्यंत साप्ताहिक विशेष गाडी सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

परंतु ही गाडी धर्मावरमपर्यंत चालवली गेली पाहिजे अशी मागणी अशी मागणी सोलापूर सह परिसरातील प्रवाशांकडून उपस्थित करण्यात आली. दरम्यान या मागणीला रेल्वे कडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि अखेर कार सोलापूर ते तिरुपती दरम्यान चालवली जाणारी साप्ताहिक विशेष गाडी आता थेट धर्मावरंपर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे भाविकांना दिलासा मिळेल अशी आशा सोलापूर सह परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत आता आपण सोलापूर ते धर्मावरम साप्ताहिक विशेष गाडीचे वेळापत्रक कसे राहणार आणि गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार या संदर्भात माहिती पाहूयात. 

कस राहणार वेळापत्रक ?

मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर – धर्मावरम साप्ताहिक विशेष गाडी 25 सप्टेंबर 2025 पर्यंत सोलापूर रेल्वे स्थानकावरून दर गुरुवारी रात्री 23.20 वाजता सोडली जाणार आहे आणि तिसऱ्या दिवशी तीन वाजून 30 मिनिटांनी ही गाडी धर्मावरम रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

दुसरीकडे, धर्मावरम – सोलापूर साप्ताहिक विशेष गाडी 27 सप्टेंबर पर्यंत दर शनिवारी धर्मावरम येथून सकाळी साडेपाच वाजता सोडली जाणार आहे आणि ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

या साप्ताहिक विशेष गाडीच्या सोलापूर ते धर्मावरम दरम्यान दहा फेऱ्या होणार आहेत आणि धर्मावरम ते सोलापूर दरम्यान दहा फेऱ्या होणार आहेत म्हणजेच या विशेष गाडीच्या एकूण 20 फेऱ्या होतील. 

विशेष गाडी कोणकोणत्या स्टेशनवर थांबा घेणार 

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार या विशेष गाडीला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. ही गाडी या मार्गावरील तब्बल 26 रेल्वे स्टेशनवर थांबा घेईल अशी माहिती रेल्वेने दिली आहे.

कुर्डूवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव, लातूर, लातूर रोड, बीदर, कलबुर्गी, वाडी, यादगीर, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड, अदोनी, गुंटकल, गुत्ती, ताडिपत्री, यरागुंटला, कडप्पा, राजमपेटा, रेणीगुंटा, तिरुपती, पाकाला, पीलेर, मदलपल्ली रोड, मुलकला चेरुव, कदीरी या महत्त्वाच्या स्थानकावर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!