Maharashtra Railway News : 2019 मध्ये भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू केली अन रेल्वेचा एक नवा अध्याय सुरु झाला. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन देशातील तब्बल 65 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर आपल्या राज्यातून सध्या स्थितीला अकरा वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. दुसरीकडे महाराष्ट्राला बुलेट ट्रेनची देखील भेट मिळणार आहे.
भारतातील पहिली बुलेट ट्रेन आपल्या महाराष्ट्रातून धावणार आहे. ही गाडी मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर सुरू होणार असून सध्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान बुलेट ट्रेन पेक्षा अधिक वेगाने धावणारी हायपरलूप ट्रेन देखील आगामी काळात सुरू होणार आहे.
महत्त्वाची बाब अशी की देशातील पहिली हायपरलूप ट्रेन आपल्या महाराष्ट्राला मिळणार असून ती गाडी मुंबई ते पुणे या मार्गावर चालवली जाणार असून या गाडीमुळे मुंबई ते पुणे हा प्रवास फक्त 25 मिनिटात पूर्ण होईल असा दावा केला जात आहे.
सध्या स्थितीला मुंबई ते पुणे असा प्रवास पूर्ण करण्यासाठी तीन ते चार तासांचा वेळ लागतोय मात्र जेव्हा या मार्गावर हायपरलूप ट्रेन सुरू होईल तेव्हा हा प्रवास फक्त आणि फक्त 25 मिनिटात पूर्ण होणार असे बोलले जात आहे.
याच्या तिकीट दराबाबत बोलायचं झालं तर या ट्रेनचे तिकीट आणि विमानाचे तिकीट हे सारखेच राहणार आहे. हायपरलूप ट्रेन दोन शहरांना थेट कनेक्ट करणार आहे म्हणजेच ही गाडी मध्ये कुठेच थांबणार नाही.
हायपरलूप ट्रेनच्या एका पॉडमध्ये 24 ते 28 प्रवासी बसू शकणार आहेत. ही गाडी 1100 किलोमीटर प्रति तास एवढ्या जलद गतीने धावण्यासं सक्षम असल्याचा दावा केला जातोय. पण, भारतीय रेल्वे जी हायपरलूप ट्रेन विकसीत करत आहे, तिचा जास्तीत जास्त वेग 600 किमी इतका आहे.
यामुळे विजेचा वापर पण कमी होईल अन प्रदूषण पण कमी होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हायपरलूप ट्रॅकचा व्हिडिओ शेअर केला आहे. रेल्वेची टीम आणि आयआयटी मद्रास या दोघांनी हा ट्रॅक तयार केला आहे.
यामुळे आता पुन्हा एकदा या ट्रेनची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे देशातील पहिली हायपरलुप ट्रेन कोणत्या मार्गावर सुरू होते आणि ही ट्रेन कधीपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे.