Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातून लवकरच एक विशेष एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे. या ट्रेनचा राज्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता मडगाव-एलटीटी दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार असून ही गाडी उद्या अर्थात 16 मार्च 2025 पासून सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान आता आपणया विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार याबाबत ही माहिती पाहणार आहोत.

कसं राहणार संपूर्ण टाईम टेबल
रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मडगाव-एलटीटी साप्ताहिक विशेष गाडी 16 व 23 मार्च 2025 रोजी चालवली जाणार आहे. ही गाडी या दोन्ही दिवशी सायंकाळी साडेचार वाजता मडगाव रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे आणि पहाटे सहा वाजून 25 मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासात ही गाडी 17 व 24 मार्च 2025 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री नऊ वाजून 40 मिनिटांनी मडगाव रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
होळी धुलीवंदन आणि शिमगोत्सवासाठी गावी गेलेल्या चाकरमान्यांसाठी ही गाडी सुरू करण्यात आली असून या गाडीमुळे या संबंधित चाकरमान्यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे.
कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार
या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील तब्बल 17 हुन अधिक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. राज्यातील पंधराहून अधिक व महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा राहणार आहे.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, या विशेष गाडीला करमळी, थिवी, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, विलवडे, आरवली, रत्नागिरी, संगमेश्वर,
चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल, ठाणे आदी स्थानकांत थांबा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे या विशेष गाडीचा प्रवाशांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.