Maharashtra Railway News : कधी नव्हे तो बीड जिल्हा अलीकडेच रेल्वेच्या नकाशावर झळकला आहे. अशातच आता मराठवाड्यातील जनतेच्या आनंदात भर घालणारी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठवाड्याला आणखी एका रेल्वे मार्गाची भेट मिळणार आहे.
धाराशिव – बीड – छत्रपती संभाजीनगर असा हा नवा रेल्वे मार्ग राहणार आहे. या मार्गासाठी मराठवाड्याला आणखी काही काळ वाट पाहावी लागेल. या मार्गाचा डीपीआर, नकाशा, खर्च अजून काहीच निश्चित झालेले नाही.

पण या मार्गाबाबत अलीकडेच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे रेल्वे बोर्डाने या मार्गासाठी फायनल लोकेशन सर्वे मंजूर केला आहे. हा या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा समजला जातोय.
याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात मार्गाचे आराखडे, नकाशे आणि खर्चाबाबत योग्य ती माहिती हाती येणार आहे. दरम्यान या प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी सहा कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आला आहे.
त्यामुळे प्रकल्पाचे सर्वेक्षण जलद गतीने पूर्ण होईल आणि याच्या पुढील कामाला गती मिळेल अशी आशा आहे. धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर हा प्रकल्प मराठवाड्याच्या एकात्मिक विकासाला चालना देणारा ठरेल.
पण याचे काम कधी पूर्ण होणार याबाबत अजून काहीही निश्चित झालेले नाही. या प्रकल्पाच्या कामाची मुदत निश्चित झालेली नसल्याने नागरिकांमध्ये याबाबत संभ्रमावस्था आहे. या प्रकल्पाचे काम वेगवेगळ्या अडथळ्यांमुळे मंदावले आहे.
जमीन अधिग्रहण, पर्यावरणीय मंजुरी, स्थानिक प्रशासनाशी समन्वय अशा अनेक अडथळ्यांमुळे प्रकल्पाचे काम अगदीच संथ गतीने सुरू आहे. पण या दरम्यानच या प्रकल्पाशी निगडित गुड न्युज समोर आलीये.
गेल्या काही महिन्यांत केंद्र सरकारकडून या प्रकल्पासाठी सकारात्मकता दाखवण्यात आली आहे. केंद्रातील सरकारने या मार्गासाठी निधी आणि तांत्रिक मंजुरी देऊन नागरिकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत केले आहेत.
या निर्णयामुळे सदर प्रकल्पाला सकारात्मक दिशा मिळाली आहे. मराठवाड्यातील अनेक पिढ्यांचा स्वप्नवत असलेला हा मार्ग आता खऱ्या अर्थाने दृष्टिक्षेपात येणार असा विश्वास आहे. दरम्यान हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर सोलापूर – छत्रपती संभाजीनगर रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे.