रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईहुन चार नवीन रेल्वे गाड्या चालवल्या जाणार, कसे असणार रूट ?

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर पुढील ऑक्टोबर महिना हा सणासुदीचा आहे.

ऑक्टोबर मध्ये नवरात्र उत्सव, विजयादशमी अर्थातच दसरा आणि दिवाळी तसेच छठपूजेसारखे मोठे मोठे सण येणार आहेत. या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या नक्कीच वाढणार आहे.

दरवर्षी दिवाळीच्या कालावधीत रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. आर्थिक राजधानीत शिक्षण, कामानिमित्त आलेली जनता दिवाळीच्या काळात पुन्हा आपल्या मूळ गावाकडे परतत असते. दरवर्षी मुंबईहून आपल्या मूळ गावाकडे परतणाऱ्यांची संख्या या काळात वाढते.

दरम्यान हीच संभाव्य गर्दी लक्षात घेता सणासुदीचा हंगाम सुरू होण्याआधीच मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबईहून चार नवीन विशेष एक्सप्रेस गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे मुंबईसहित उत्तर महाराष्ट्रातील जनतेला दिलासा मिळणार आहे.

कारण की या चार पैकी तीन गाड्या भुसावळ रेल्वे स्थानकावर आणि एक गाडी जळगाव रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. दरम्यान आता आपण या गाड्या नेमक्या कोणकोणत्या रेल्वे स्थानकादरम्यान धावणार या संदर्भात माहिती पाहणार आहोत.

विशेष गाड्यांचे मार्ग कसे असणार?

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एलटीटी-नागपूर ही दिवाळी विशेष गाडी चालवली जाणार आहे. ही गाडी 31 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर पर्यंत चालवली जाणार आहे. या गाडीला उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरखपूर दरम्यानही दिवाळी विशेष गाडी धावणार असून ही गाडी 22 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान चालवली जाणार आहे. या गाडीला मात्र जळगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

याशिवाय, सीएसएमटी ते अन्सोल दरम्यान दिवाळी विशेष गाडी चालवले जाणार आहे. दिवाळीच्या काळात धावणाऱ्या या विशेष एक्सप्रेस ट्रेनला भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते दानापूर दरम्यान 22 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान दिवाळी विशेष गाडी चालवली जाणार आहे. ही गाडी उत्तर महाराष्ट्रातून धावणार असून या गाडीला भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.