Maharashtra Railway News : रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मागील तीन दशकांपासून प्रलंबित असणारा एक महत्त्वाचा प्रश्न रेल्वे मंत्रालयाने अखेरकार आता निकाली काढला आहे. राज्याला एका नव्या एक्सप्रेस ट्रेन ची भेट मिळाली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई – बेंगलोर एक्सप्रेस ट्रेन सुरू करा ही मागणी केल्या तीन दशकांपासून उपस्थित केली जात होती. यासाठी सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा देखील करण्यात आला होता.

परंतु रेल्वे मंत्रालयाकडून या संदर्भात सकारात्मक निर्णय होत नव्हता आणि यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये सरकार विरोधात तसेच रेल्वे मंत्रालया विरोधात प्रचंड नाराजी पाहायला मिळाली. पण आता रेल्वे मंत्रालयाने मुंबई बेंगलोर एक्सप्रेस गाडीला मंजुरी दिली आहे.
मुंबई बेंगलोर सुपरफास्ट एक्सप्रेस आता मिरज मार्गे धावण्यास सज्ज झाली असून यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा प्रवास सुपरफास्ट होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. खरंतर मुंबई बेंगलोर सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन साठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती.
या भेटीत त्यांनी मुंबई बेंगलोर सुपरफास्ट एक्सप्रेस लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी आग्रही मागणी उपस्थित केली. तसेच ही गाडी प्रवाशांसाठी कशी उपयुक्त आहे आणि यामुळे रेल्वेच्या महसुलात कशा पद्धतीने वाढ होऊ शकते हे सुद्धा जोशी यांनी रेल्वेमंत्र्यांना पटवून सांगितले.
दरम्यान प्रल्हाद जोशी यांच्या या पाठपुराव्यानंतर अश्विनी वैष्णव यांनी मुंबई बेंगलोर सुपरफास्ट ट्रेन सुरू करण्यास सकारात्मकता दाखवली होती. त्यानंतर आता रेल्वे मंत्रालयाने मुंबई – बेंगलोर सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे.
रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे आता बेळगावहून मिरज-सांगलीमार्गे मुंबई आणि बंगळुरुसाठी आणखी एक सुपरफास्ट एक्स्प्रेस उपलब्ध होणार आहे. खरेतर, मागील 30 वर्षांपासून या दोन शहरांना जोडणारी उद्यान एक्स्प्रेस सोलापूर-गुंटकलमार्गे धावत आहे.
पण आता या नव्या एक्स्प्रेसद्वारे बेळगाव, हुबळी, धारवाड, हावेरी, दावणगेरी हे जिल्हेही जोडले जाणार अशी माहिती जाणकारांकडून समोर आली आहे. महत्वाची बाब म्हणजे याचा बेळगाव, सांगली, मिरज या भागातील प्रवाशांना सुद्धा मोठा फायदा होणार आहे. या गाडीला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
मात्र गाडीचे वेळापत्रक कसे असणार आणि कधीपासून ही गाडी प्रवाशांच्या सेवेत येईल यासंदर्भात अद्याप रेल्वे कडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर डिसेंबर 2025 पासून ही गाडी प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.