Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या नॉन एसी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन असे सुद्धा म्हणतात.
मात्र अजून महाराष्ट्रात अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन सुरु झालेली नव्हती. पण आता महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी ही गाडी सुरू झाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला राज्यातील पहिल्या अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनची भेट मिळाली आहे.

ही गाडी काल शुक्रवार 25 एप्रिल 2025 रोजी मुंबई ते सहरसा यादरम्यान चालवली गेली आहे. मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते बिहार राज्यातील सहरसा यादरम्यान अमृतभारत एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे मुंबई ते बिहार दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली असून ही गाडी कालपासून सुरू करण्यात प्रवाशांच्या माध्यमातून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन बाबत बोलायचं झालं तर या गाडीचा वेग 130 किलोमीटर प्रति तास एवढा आहे.
या गाडीमध्ये वंदे भारत एक्सप्रेस मध्ये असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत फक्त ही गाडी नॉन एसी प्रकारातील आहे. या गाडीला 22 डबे बसवण्यात आले आहेत. या गाडीच्या दोन्ही टोकांना इंजिन असते ज्यामुळे या गाडीचा वेग इतर एक्सप्रेस ट्रेन च्या तुलनेत अधिक असतो अशी माहिती जाणकारांकडून प्राप्त झाली आहे.
एकंदरीत मुंबई ते बिहार दरम्यान सुरू करण्यात आलेल्या अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन मुळे राज्यातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे कारण की राज्यातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे.
खरंतर बिहारला मिळालेली अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन ही बिहार राज्यातील दुसरी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन आहे. याआधी बिहार ते दिल्ली दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली होती. दरम्यान आता बिहार मधील जनतेसाठी सहरसा ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई या दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली असल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवासांना साहजिकच मोठा दिलासा मिळणार आहे. आता आपण ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
वेळापत्रक कस असणार?
रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 11015 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दिनांक दोन मे 2025 पासून दर शुक्रवारी 12 वाजता सोडली जाईल आणि तिसऱ्या दिवशी 2 वाजता सहरसा येथे पोहोचणार आहे. तसेच ट्रेन क्रमांक 11016 चार मे 2025 पासून दर रविवारी चार वाजून वीस मिनिटांनी सहरसा रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 15.45 वाजता पोहोचणार आहे.
‘या’ स्थानकावर थांबणार अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार अमृतभारत एक्सप्रेस ट्रेन ला या स्थानकावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे. ही गाडी या मार्गावरील ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार आहे
यासोबतच ही गाडी भुसावळच्या पुढे इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपुर, प्रयागराज छिवकी, मिर्जापुर, पं.दीन दयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर, पाटलीपुत्र, सोनपुर, हाजीपुर जंक्शन, मुज़फ्फरपुर, समस्तीपुर, हसनपुर रोड, सलौना आणि खगड़िया जंक्शन या रेल्वेस्थानकावर थांबा घेईल असे सुद्धा अधिकाऱ्यांकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.