डिसेंबर 2024 मध्ये सुरु होणार देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ! ‘या’ शहराला मिळणार मोठी भेट, कसा असणार रूट ?

येत्या काही दिवसांनी महाराष्ट्राला आणखी सहा नवीन गाड्यांची भेट मिळेल अशी आशा आहे. सध्या राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद सीएसएमटी ते सोलापूर सीएसएमटी ते शिर्डी सीएसएमटी ते जालना सीएसटी ते मडगाव नागपूर ते बिलासपुर नागपूर ते इंदोर नागपूर ते सिकंदराबाद पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे

Published on -

Maharashtra Railway News : वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता देशात लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील सुरू होणार आहे. सध्या चेअर कार प्रकारातील वंदे भारत एक्सप्रेस आणि वंदे मेट्रो ट्रेन सुरू आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी देशातीलच 65 मार्गांवर सुरू आहे. आपल्या महाराष्ट्राला आतापर्यंत अकरा बंदे भारत एक शुभेच्छा भेट मिळाली आहे.

मात्र येत्या काही दिवसांनी महाराष्ट्राला आणखी सहा नवीन गाड्यांची भेट मिळेल अशी आशा आहे. सध्या राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद सीएसएमटी ते सोलापूर सीएसएमटी ते शिर्डी सीएसएमटी ते जालना सीएसटी ते मडगाव नागपूर ते बिलासपुर नागपूर ते इंदोर नागपूर ते सिकंदराबाद पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.

वंदे भारत मेट्रोबाबत बोलायचं झालं तर ही गाडी गुजरात मध्ये सुरू आहे. अहमदाबाद ते साबरमती या मार्गांवर ही गाडी धावत आहे. दरम्यान आता वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार असून या गाडीची भेट आधी मध्य प्रदेश राज्याला मिळणार अशी बातमी हाती आली आहे.

भविष्यात महाराष्ट्रालाही वंदे भारत शिल्पर ट्रेनची भेट मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील मुंबई आणि पुण्याहून ही गाडी सुरू होणार असा अंदाज आहे. मुंबई ते दिल्ली आणि पुणे ते दिल्ली या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू होऊ शकते असे म्हणणे आहे. दरम्यान आता आपण मध्यप्रदेशला मिळणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चे रूट आणि वेळापत्रक जाणून घेऊयात.

कसा असणार रूट

ही स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस मध्यप्रदेश राज्याच्या राजधानीहुन अर्थातच भोपाळच्या RKMP रेल्वे स्थानकावरून सुरू होणार आहे. या गाडीचा रॅकही वाटप करण्यात आला असून लवकरच तो भोपाळला पोहोचणार आहे.

अर्थातच ही गाडी डिसेंबर 2024 मध्ये सुरू होण्याची दाट शक्यता आहे. डिसेंबरच्या दुसऱ्याच आठवड्यात या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाईल असे काही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ही स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस आरकेएमपी ते पाटलीपुत्र दरम्यान चालवली जाणार आहे.

सुरुवातीला ही गाडी आठवड्यातून फक्त दोनच दिवस चालवली जाईल असे म्हटले गेले आहे. राणी कमलापती रेल्वे स्टेशन (RKMP) ते पाटलीपुत्र (पाटणा) पर्यंत धावणारी ही वंदे भारत एक्सप्रेस भोपाळ रेल्वे विभागाची ट्रेन राहणार आहे.

या ट्रेनमुळे पाटणा ते राणी कमलापती रेल्वे स्टेशन दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे. सध्या या मार्गावर धावणाऱ्या इतर गाडयांना जेवढा वेळ लागतोय त्यापेक्षा दोन तास आधीच वंदे भारत स्लीपर ट्रेन ने प्रवास करता येणे शक्य होणार आहे.

भोपाळचे डीआरएम कमर्शियल सौरभ कटारिया यांनी या स्लीपर वंदे भारत ट्रेनची माहिती दिली. कटारिया यांनी सांगितल्याप्रमाणे, आरकेएमपी-पाटलीपुत्र वंदे भारत आठवड्यातून दोन दिवस चालवली जाणार आहे. ज्यासाठी सध्या एक रेक वाटप करण्यात आला आहे.

स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसचा रेक 20 डब्यांचा असेल. नवीन वंदे भारत एक्स्प्रेसचा हा रेक नोव्हेंबरच्या अखेरीस भोपाळला पोहोचणार आहे. RKMP-पाटलीपुत्र स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ही भोपाळ रेल्वे विभागाची ट्रेन असेल.

वंदे भारत स्लीपर ट्रेन RKMP येथून संध्याकाळी 5 च्या सुमारास सुटेल असे सांगण्यात येत आहे. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी 11 च्या सुमारास पाटलीपुत्रला पोहोचेल. अशाप्रकारे, स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस RKMP स्टेशन ते पाटलीपुत्र स्थानकापर्यंतचे 1005 किमीचे अंतर सुमारे 18 तासांत पूर्ण करेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe