Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतातील सर्वात मोठे रेल्वे टर्मिनल आपल्या महाराष्ट्रात विकसित होणार आहे. सध्या रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून विविध प्रकल्पांवर काम सुरू आहे. शहरा-शहरांमधील अंतर कमी व्हावे यासाठी नवनवीन रेल्वे मार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत.
याशिवाय, देशातील रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी अलीकडेच केंद्रातील सरकारने एक विशेष उपक्रम हाती घेतला असून या अंतर्गत देशातील सर्वात मोठे रेल्वे टर्मिनल आपल्या राज्यात विकसित होणार आहे. हे रेल्वे टर्मिनल पुण्यात तयार होणार असून यामुळे पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.

कुठे तयार होणार भारतातील सर्वात मोठे रेल्वे टर्मिनल?
पुणे शहरातील रेल्वे नेटवर्क सुधारण्यासाठी उरळी कांचन या ठिकाणी देशातील सर्वात मोठे रेल्वे टर्मिनल विकसित होणार आहे. याशिवाय, पुण्यातील आणखी काही रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. रेल्वेमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे, उरुळी कांचन येथील स्टेशनवर देशातील सर्वात मोठं टर्मिनल उभारले जाईल.
यामुळे या रेल्वेस्थानकात रेल्वे गाड्यांच्या वाढत्या संख्येला सामोरे जाण्याची क्षमता तयार होईल. फक्त उरळी कांचनच नाही तर हडपसर आणि शिवाजीनगर स्टेशनचा सुद्धा विकास करण्यात येणार आहे.
खरे तर, उरळी कांचन या ठिकाणी टर्मिनल पूर्ण झाल्यानंतर, पुणे रेल्वे स्टेशनवरून गाड्या उरुळी कांचन येथे सर्व्हिसिंग आणि देखभालसाठी जातील, आणि नंतर त्या परत पुणे स्टेशनकडे रवाना होतील. या सुविधेमुळे रेल्वे गाड्यांची कार्यक्षमता वाढेल आणि प्रवाशांची सुद्धा सोय होईल.
यामुळे पुणे रेल्वे स्टेशन वरील बार बऱ्यापैकी कमी होणार आहे. यामुळे पुणेकरांना अधिक आरामदायक, जलद आणि सोयीस्कर रेल्वे सेवा मिळणार असा विश्वास जाणकार लोकांकडून व्यक्त केला जात आहे.