Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी होळी सणाच्या निमित्ताने विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. यंदा 14 मार्च 2025 रोजी देशात होळीचा सण साजरा होणार आहे आणि याच मोठ्या सणासाठी रेल्वे विभागाच्या माध्यमातून स्पेशल गाड्या सुरू केल्या जात आहेत. राज्यातील कोकण रेल्वे मार्गावर देखील रेल्वे विभागाकडून काही स्पेशल गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.
आज 11 मार्च 2025 पासून दादर ते रत्नागिरी या मार्गावर देखील विशेष गाडी चालवली जाणार आहे. दरम्यान आज आपण दादर ते रत्नागिरी दरम्यान सुरू करण्यात आलेल्या याच विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार याची माहिती जाणून घेणार आहोत.

कस राहणार विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक
दरवर्षी होळी सणाच्या काळात दादर ते रत्नागिरी या मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. यंदाही या मार्गावर अशीच गर्दी राहणार अशी शक्यता आहे. याचमुळे दादर ते रत्नागिरी या मार्गावर आजपासून 16 डब्बे असणारी विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे ही गाडी अनारक्षित राहणार आहे. या विशेष गाडीच्या दादर ते रत्नागिरी अशा तीन आणि रत्नागिरी ते दादर अशा तीन फेऱ्या होणार आहेत. म्हणजेच दादर-रत्नागिरी-दादर या विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या एकूण सहा फेऱ्या होणार आहेत आणि यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल अशी आशा प्रवासी संघटनांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
या ट्रेनच्या वेळापत्रकांबाबत बोलायचं झालं तर गाडी क्र. 01131 ही दादर रत्नागिरी होळी विशेष गाडी 11 मार्च, 13 मार्च आणि 16 मार्च 2025 रोजी 14:50 ला सोडली जाणार आहे आणि रात्री 23:40 ला ही रत्नागिरीला पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर गाडी क्र. 01132 रत्नागिरी दादर स्पेशल गाडी 12 मार्च, 14 मार्च आणि 17 मार्च 2025 रोजी सकाळी साडेचार वाजता रत्नागिरी येथून सोडली जाणार आहे आणि दुपारी ही गाडी 13:25 वाजता दादर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
कोणत्या स्थानकावर थांबा घेणार
दादर ते रत्नागिरी दरम्यान सुरू करण्यात आलेल्या या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. या मार्गावरील तब्बल 11 रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ही विशेष गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुपरफास्ट होईल अशी आशा आहे.