महाराष्ट्राला मिळणार नवा दुहेरी रेल्वे मार्ग ! ‘या’ रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादनाची तयारी सुरू

महाराष्ट्रात तसेच देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी रेल्वेच्या माध्यमातून विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी देखील असाच एक महत्त्वाचा प्रकल्प रेल्वे कडून हाती घेण्यात आला आहे.

Published on -

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी विशेषता मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळावी यासाठी मराठवाड्यातील सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यांमध्ये विविध प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मराठवाड्यात रेल्वेची देखील अनेक प्रकल्प सुरू आहेत.

यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रकल्प म्हणजेच छत्रपती संभाजीनगर-परभणी या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण. आता याच जवळपास 178 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाच्या बाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत आज आपण या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाच्या संदर्भातील सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा आहे प्रकल्प ? 

मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजी नगर ते परभणी हा 177.29 किमी लांबीच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण केले जाणार आहे. खरंतर, हा दुहेरीकरणाचा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र आता या रेल्वे मार्गाच्या बहुप्रतीक्षित दुहेरीकरण प्रकल्पास गती मिळाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, दक्षिण-मध्य रेल्वेकडून या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळला होता आणि आता या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील रेल्वे प्रवास अधिक सुलभ होणार अशी माहिती देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील कृषी उद्योग पर्यटन शिक्षण अशा विविध क्षेत्रांना मोठा फायदा होणार आहे.

प्रकल्पाची सद्यस्थिती काय आहे 

या प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत बोलायचं झालं तर यासाठीचे सर्वेक्षण कधीच पूर्ण झाले असून याचा डीपीआर सुद्धा रेडी झालेला आहे. याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) गतवर्षी रेल्वे मंत्रालयाकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. या दुहेरीकरण प्रकल्प बाबत बोलायचं झालं तर हा प्रकल्प ब्राऊनफिल्ड विस्ताराचा भाग आहे.

या प्रकल्पाच्या उद्देशाबाबत माहिती देताना रेल्वेने असे सांगितले आहे की, विजयवाडा-बल्हारशाह आणि सिकंदराबाद-मुंबई रेल्वेमार्गावरील ताण कमी करणे, तसेच मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी कार्यक्षम पर्याय निर्माण करणे हा या दुहेरीकरण प्रकल्पाचा उद्देश आहे.

कसा आहे रेल्वे मार्ग 

छत्रपती संभाजी नगर – परभणी रेल्वे मार्ग तीन जिल्ह्यांमधून जातो. मराठवाड्यातील तीन महत्त्वाच्या जिल्ह्यांना हा मार्ग जोडतो. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या मराठवाड्यातील तीन अतिशय महत्त्वाच्या जिल्ह्यांतून हा रेल्वेमार्ग जातो. आता या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी या संबंधित जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की याआधी छत्रपती संभाजीनगर-अंकाई (मनमाड) मार्गाचे दुहेरीकरण सुरू झाले असून, ते काम आता अंतिम टप्प्यात सुद्धा पोहचले आहे. दरम्यान छत्रपती संभाजी नगर परभणी रेल्वे मार्ग प्रकल्पाचे दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील रेल्वेगाड्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे मराठवाड्याच्या विकासासाठी हा दुहेरीकरण प्रोजेक्ट गेमचेंजर ठरणार अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe