Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्याला आता एका नवीन रेल्वेमार्गाची भेट मिळणार असून येत्या 30 दिवसात म्हणजे पुढील एका महिन्यात याबाबतचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार होणार असल्याची माहिती सुद्धा दिली जात आहे.
यामुळे राज्यातील रेल्वेची कनेक्टिव्हिटी आणखी वाढणार आणि सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना यामुळे दिलासा मिळणार असल्याची आशा व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर ते पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर यादरम्यान एक नवा रेल्वे मार्ग विकसित होणार असून या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.

महत्त्वाचे म्हणजे या सर्वेक्षणाला मान्यता मिळाल्यानंतर आता पुढील काही दिवसांमध्ये याचा डी पी आर सुद्धा रेडी होणार आहे. या कामासाठी साधारणता एका महिन्याचा काळ लागू शकतो. दरम्यान आता आपण छत्रपती संभाजी नगर ते अहिल्यानगर हा रेल्वे मार्ग प्रकल्प नेमका कसा असू शकतो याचा एक थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा आहे प्रकल्प ?
खरे तर, दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने सुरु असलेल्या विविध कामाचा आढावा घेण्यासाठी केंद्र राज्यमंत्री खासदार डॉ. भागवत कराड यांनी नुकतीच एक बैठक घेतली. ही बैठक छत्रपती संभाजी नगर रेल्वेस्थानकावर झाली यात दक्षिण मध्य रेल्वे, मध्य रेल्वे व संबंधीत अधिकाऱ्यांसोबत विविध प्रकल्पांवर चर्चा झाली.
या बैठकीत अहिल्यानगर ते छत्रपती संभाजी नगर रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली. खरे तर या बैठकीत या प्रकल्पाचे तीन सर्वे सादर करण्यात आले होते यापैकी तिसऱ्या सर्वेला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.
वास्तविक पाहता अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर यादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. यामुळे यादरम्यान रेल्वे मार्गाची निर्मिती झाली पाहिजे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती.
या रेल्वे मार्गासाठी स्वतः खासदार डॉक्टर भागवत कराड हे सुद्धा आग्रही होते. दरम्यान, आता छत्रपती संभाजी नगर ते अहिल्यानगर रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी हालचाली तीव्र झाल्या आहेत. या रेल्वे मार्ग प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर हा रेल्वे मार्ग 85 किलोमीटर लांबीचा राहील.
या प्रकल्पासाठी जवळपास 3238 कोटी रुपयांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी 640 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. या रेल्वे मार्गावर नऊ स्थानके राहतील. छत्रपती संभाजीनगर, शरणापूर, अंबेगाव, येसगाव, गंगापूर, देवगड, नेवासा, उस्थल दुमला, शनि शिंगणापूर, आणि वांभोरी हि महत्वाची स्थानके या मार्गावर असतील.
पण, यामध्ये रांजणगावाला सुद्धा स्थानक असायला अशी सुचना डॉ. कराड यांनी नुकतीच केली आहे. त्यामुळे आता रांजणगाव हे स्थानक सुद्धा यामध्ये ऍड होणार आहे. तसेच या प्रकल्पाचा डीपीआर पुढील महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत तयार होऊ शकतो असा एक अंदाज आहे.
दरम्यान, याच्या डीपीआरला मंजूरी मिळाली की मग नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपची बैठक होईल अन तिथे मंजूरी मिळाली की निविदा प्रक्रियेला सुरवात होणार असल्याची माहिती जाणकार लोकांकडून देण्यात आली आहे.