महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवीन रेल्वे मार्ग ! ‘ही’ शहरे एकमेकांना जोडली जाणार, कसा असणार रूट ?

Published on -

Maharashtra Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फार उल्लेखनीय आहे. कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा असतो आणि रेल्वेचे नेटवर्क हे फार मोठे आहे. मात्र आजही भारतातील असे काही भाग आहेत जे रेल्वेच्या नेटवर्कशी जोडलेले नाहीत.

पण जे भाग रेल्वे नेटवर्क सोबत जोडलेले नाहीत तेव्हा रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून रेल्वेने जोडण्याचा प्रयत्न होतो. अशातच आपल्या महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ते म्हणजे राज्यात आणखी एक नवा रेल्वे मार्ग तयार होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा नवीन मार्ग मराठवाड्यातील तीन जिल्हे जोडणार आहे. धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर हा नवा रेल्वेमार्ग होणार असून यामुळे मराठवाड्यातील या तिन्ही जिल्ह्यांचा विकास सुनिश्चित होईल अशी आशा आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की छत्रपती संभाजीनगर होणे सध्या बीड आणि धाराशिव कडे प्रवास जर करायचा असेल तर रस्ते मार्गाशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरत नाही. हेच कारण आहे की गेल्या अनेक वर्षांपासून बीड आणि धाराशिवला छत्रपती संभाजीनगर सोबत रेल्वेने जोडायला हवे यासाठी मागणी जोर धरत आहे.

मात्र अजून पर्यंत ही मागणी काही पूर्ण झालेली नाही. पण 2022 मध्ये या मार्गासाठी रेल्वे सर्वेक्षण करण्यात आले होते. 2022 मध्ये या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले म्हणून हा रेल्वे मार्ग लवकरच रेडी होईल आणि येथील नागरिकांना दिलासा मिळेल अशी आशा होती. मात्र सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतरही या रेल्वेमार्ग प्रकल्पाबाबत पुढे काहीच झाले नाही.

दरम्यान बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी या प्रकल्पाबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. आणि आता अखेरकार या प्रकल्पासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुकत्याच काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खा. सोनवणे यांना एका पत्राद्वारे या रेल्वे मार्ग प्रकल्पसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे.

रेल्वेमंत्र्यांनी धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या नवीन रेल्वे मार्गाच्या मंजुरीच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना तपासणीचे आदेश दिले असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या रेल्वेमार्गाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच अनेक वर्षांपासून कागदावर असलेला मार्ग आता तरी मार्गी लागणार अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News