महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मोदी सरकार राज्यात दोन नवीन रेल्वे मार्ग बनवणार, कसे असणार रोड मॅप ? वाचा….

केंद्रातील सरकारने राज्यात दोन नवीन रेल्वे मार्ग बांधण्याची मोठी घोषणा केली असून या दोन्ही रेल्वे मार्गांना आज मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. खरंतर आज केंद्रातील मोदी सरकारने तीन रेल्वे मार्गांना मंजुरी दिली आहे. यातील मार्गांमधील दोन मार्ग हे आपल्या महाराष्ट्रातील आहेत हे विशेष.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. केंद्रातील मोदी सरकारने गेल्या दहा-बारा वर्षांच्या काळात महाराष्ट्राला अनेक मोठमोठ्या प्रकल्पांची भेट दिली आहे. दरम्यान आजही मोदी सरकारने महाराष्ट्राला एक मोठी भेट दिली आहे.

केंद्रातील सरकारने राज्यात दोन नवीन रेल्वे मार्ग बांधण्याची मोठी घोषणा केली असून या दोन्ही रेल्वे मार्गांना आज मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. खरंतर आज केंद्रातील मोदी सरकारने तीन रेल्वे मार्गांना मंजुरी दिली आहे.

यातील मार्गांमधील दोन मार्ग हे आपल्या महाराष्ट्रातील आहेत हे विशेष. यामुळे राज्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटी आधीच्या तुलनेत अधिक मजबूत आणि सक्षम होणारा असून याचा साहजिकच राज्यातील विकासाला मोठा फायदा होणार आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला या नव्या रेल्वे मार्गाचा मोठा फायदा होईल असे म्हटले जात आहे.

आज भारतीय रेल्वेने 160 किलोमीटर लांबीचा जळगाव मनमाड चौथा रेल्वे मार्ग, 131 किलोमीटर लांबीचा भुसावळ ते खंडवा तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्ग, आणि 84 किलोमीटर लांबीचा प्रयागराज माणिकपूर तिसरा रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मेंद्र मीना यांनी आज पत्रकार परिषदेत या तिन्ही मार्गांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती दिली आहे. या तिन्ही रेल्वे मार्ग प्रकल्पांसाठी 7,927 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, मनमाड ते जळगावदरम्यान 160 किमी लांबीची चौथी रेल्वे लाइन टाकली जाणार आहे अन यासाठी 2773 कोटी रुपये खर्च होणार आहेत.

तसेच, भुसावळ ते खंडवा या मार्गावर 131 किमी लांबीची तिसरी आणि चौथी रेल्वे लाइन टाकली जाणार आहे, यासाठी तब्बल 3514 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या दोन्ही रेल्वे मार्गांमुळे सहाजिकच महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला बळकटी मिळणार आहे.

महत्त्वाची बाब अशी की हे रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावेत यासाठी शासन कटिबद्ध आहे. हे रेल्वे मार्ग पुढील चार वर्षात पूर्ण केले जातील असा दावा करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe