Maharashtra Railway News : राज्यातील प्रवाशांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता बिहार राज्यातून महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या नागरिकांसाठी ही बातमी अधिक कामाची ठरणार आहे. कारण की बिहारी बाबूंसाठी कोकण रेल्वे मार्गावर एक विशेष गाडी चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
कोकण रेल्वे मार्गावरून बिहारला जाणाऱ्या प्रवाशांसाठी उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या अतिरिक्त गर्दीच्या अनुषंगाने विशेष गाडी रन करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

रेल्वे प्रशासनाने गोव्यातील वास्को द गामा ते बिहारमधील मुजफ्फरपूर दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती प्रशासनाकडून समोर आली आहे. दरम्यान आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
वास्को द गामा ते मुजफ्फरपुर विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक कसे आहे?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार उन्हाळी सुट्ट्यांच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या समर स्पेशल ट्रेनचा प्रवास ७ एप्रिल २०२५ पासून सुरू होणार असून, २ जून २०२५ पर्यंत दर आठवड्याला ही गाडी सेवा देणार आहे.
वास्को द गामा-मुजफ्फरपूर साप्ताहिक एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०७३११) प्रत्येक सोमवारी सायंकाळी ४ वाजता वास्को द गामा येथून रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता मुजफ्फरपूर येथे पोहोचेल.
तर, परतीची गाडी मुजफ्फरपूर-वास्को द गामा साप्ताहिक एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०७३१२) प्रत्येक गुरुवारी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी मुजफ्फरपूर येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी गोव्यातील वास्को द गामा येथे पोहोचेल.
ही सेवा १० एप्रिलपासून ५ जून २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी ही ट्रेन उपयुक्त ठरणार आहे. दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढते.
अन याच संभाव्य गर्दीच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने वास्को द गामा ते मुजफ्फरपुर यादरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय. या विशेष गाडीमुळे कोकण आणि बिहारमधील प्रवाशांना थेट आणि सुलभ प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
दरम्यान या समर स्पेशल ट्रेन चा प्रवाशांनी अधिकाधिक फायदा घ्यावा असे आवाहन देखील रेल्वेच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले आहे.