महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! 1 जून 2025 पासून सुरु होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, दक्षिण मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी दक्षिण मध्य रेल्वे कडून एक नवीन गाडी चालवली जाणार आहे.

Published on -

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमधून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे.

महाराष्ट्रातून धावणाऱ्या विविध रेल्वे मार्गावरील गाड्या हाऊसफुल धावत आहेत. प्रवाशांना तिकीट मिळत नसल्याची वास्तविकता सुद्धा नाकारून चालणार नाही आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन आता दक्षिण मध्य रेल्वेच्या माध्यमातून एक नवीन निर्णय घेण्यात आला आहे.

दक्षिण मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयानुसार, मराठवाड्यातील दोन महत्त्वाच्या शहरादरम्यान एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.

दरम्यान आज आपण याच विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार ? या संदर्भातील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोण-कोणत्या शहरादरम्यान धावणार नवीन एक्सप्रेस?

मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी दक्षिण मध्य रेल्वेकडून जालना ते पूर्णा या दोन रेल्वे स्थानकादरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर वाढणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे जालना ते पूर्णा हा प्रवास वेगवान होईल अशी अशा व्यक्त करण्यात आली आहे. नक्कीच रेल्वेच्या या निर्णयाचा मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना फायदा होणार आहे.

नव्या एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक कसे राहणार ? 

जालना ते पूर्णा या दोन महत्त्वाच्या रेल्वे स्थानकादरम्यान सुरू केल्या जाणाऱ्या या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक नुकतेच रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे.

यानुसार, जालना ते पूर्णा दरम्यान चालवली जाणारी ही विशेष एक्सप्रेस ट्रेन साप्ताहिक राहणार आहे, म्हणजेच आठवड्यातून एक दिवस चालवली जाईल. ही विशेष गाडी एक जून 2025 पासून सुरू होणार आहे आणि 27 जुलै पर्यंत चालवली जाणार आहे.

ही गाडी अनारक्षित राहणार आहे. पूर्णा ते जालना ही विशेष गाडी या कालावधीत पूर्णा येथून रविवारी सायंकाळी पाच वाजता सोडली जाणार आहे आणि जालना येथे रात्री 8 वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचणार आहे.

तसेच जालना ते पूर्णा ही विशेष गाडी जालना इथून दर गुरुवारी सोडली जाणार आहे. जालना – पूर्णा समर स्पेशल ट्रेन या मार्गावरील परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News